Cotton Bollworm Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Bollworm : बोंड अळीमुळे कापसाचा एकरी २ क्विंटलचा उतारा

Cotton Production : एकरी अवघा दोन क्विंटल कापूस येत असल्याने उत्पादन खर्चही निघणे अवघड झाले आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : चोपडा तालुक्यात या वर्षी कपाशीच्या पिकात बोंड अळी कमालीची वाढली. त्यामुळे कापूस उत्पादकांचे कंबरडे मोडले आहे. एकरी अवघा दोन क्विंटल कापूस येत असल्याने उत्पादन खर्चही निघणे अवघड झाले आहे. बोंड अळीची समस्या वाढल्याने अनेक शेतकरी पीक काढून त्यात इतर पिकांची लागवड करीत आहेत.

खानदेशात इतर भागांतही अशीच परिस्थिती असून, चोपडा तालुक्यात खरीपपूर्व कपाशी उपटणे सुरू आहे. पावसाच्या पाण्यावर लावलेल्या कपाशीच्या पिकाची एक वेचणी झाली आहे. तालुक्यात सुमारे ६० हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीचे पीक असले तरी माल कमी येत आहे. त्यात वेचणी खर्चही वाढला आहे.

यावर्षी निंदणी अधिक, वेचणी अधिक आणि भाव निम्म्यावर अशी स्थिती आहे. त्यामुळे कपाशीच्या पिकापासून येणाऱ्या उत्पादनाच्या आशा मावळल्या आहेत. काही शेतकऱ्यांना बागायतीत एकरी चार ते पाच क्विंटल उत्पादन आले आहे. कोरडवाहू क्षेत्रात मात्र ते एक ते दोन क्विंटल इतकेच उत्पादन येत आहे.

सध्या तालुक्यात कापूस ७००० ते ७२०० रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी होत आहे. भाव स्थिर आहेत. गेल्या दोन वर्षांत उत्पादन अधिक येऊन भाव ७५०० ते १४००० रुपये राहिले.

या वर्षी ती तेजी नाही. बोंड अळीमुळे कीटकनाशकांची विक्री वाढली, मात्र उत्पादन वाढले नाही. त्यामुळे गहू, हरभरा, मक्याचा रब्बी हंगामही उशिरा होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Parbhani DCC Bank Election: परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ८ जागांचे निकाल जाहीर

CSC Crop Insurance Services: विमा हप्त्याव्यतिरिक्त अतिरिक्त शुल्क देऊ नका : दत्तकुमार कळसाईत

Paddy Transplantation: डहाणू तालुक्यात पावसाच्या विश्रांतीने बळीराजा शिवारात

Road Widening Project: मोहोळ-वळसंग रस्ता रुंदीकरणासाठी ९२ हेक्टर जमिनीचे होणार भूसंपादन

MIDC Industries Face Warning: शेतीचे नुकसान; रासायनिक कंपन्यांना इशारा

SCROLL FOR NEXT