Cotton Bollworm : ‘कीटकनाशक प्रतिकारक्षमता व्यवस्थापन’ प्रकल्प कार्यान्वित

Pesticide Resistance Management : मराठवाड्यासह इतर कापूस उत्पादक जिल्ह्यांत गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी ‘कीटकनाशक प्रतिकारक्षमता व्यवस्थापन रणनीतीचा प्रसार प्रकल्प’ कार्यान्वित करण्यात आला आहे.
Pesticide Resistance Management
Pesticide Resistance ManagementAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाड्यासह इतर कापूस उत्पादक जिल्ह्यांत गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी ‘कीटकनाशक प्रतिकारक्षमता व्यवस्थापन रणनीतीचा प्रसार प्रकल्प’ कार्यान्वित करण्यात आला आहे.

कापूस पिकात सद्यःस्थितीत गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. या अळीने बहुतेक कीटनाशकांना तोंड देत बोंडाच्या आतमध्ये आपला क्लिष्ट जीवनक्रम पीकहानी स्तरापर्यंत पोहोचवला आहे.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pesticide Resistance Management
Cotton Bollworm : अकोला जिल्ह्यात कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव

या अनुषंगाने भारतीय कृषी संशोधन परिषद, नवी दिल्ली (आयसीएआर) आणि केंद्रीय कापूस संशोधन केंद्र नागपूरमार्फत ‘कीटकनाशक प्रतिकारक्षमता व्यवस्थापन रणनीतीचा प्रसार प्रकल्प देशभरातील उत्पादकांच्या प्रक्षेत्रावर सुरू करण्यात आला आहे.

Pesticide Resistance Management
Cotton Bollworm : गुलाबी बोंड अळीचे संकट टळले

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, जालना या जिल्ह्यांतील प्रत्येकी पाच गावांत हा प्रकल्प राबविला जात आहे. जालना जिल्ह्यात मार्गदर्शक तत्त्वावर कृषी संशोधन केंद्र बदनापूरचा समावेश आहे. या केंद्राचे हा प्रकल्प राबविण्याचे हे सहावे वर्ष आहे. इतर जिल्ह्यात यंदा पहिल्यांदाच हा प्रकल्प राबविला जात आहे.

जालना जिल्ह्यातील कोदोली (ता. भोकरदन), दरेगाव (ता. जालना) तर वाहेगाव, धोपटेश्वर, गेवराई (ता. बदनापूर) येथे हा प्रकल्प राबविला जात आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांना जैविक पद्धतीने गुलाबी बोंड अळीचे एकात्मिक कीड व्यवस्थापन मार्गदर्शन, निविष्ठा वितरण करण्यात आले. या वेळी कृषी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. के. टी. जाधव, प्रकल्प समन्वयक डॉ. डी. एस. मुटकुळे, वरिष्ठ संशोधन सहकारी राजेश उदावंत, सुनील मगरे, लाभार्थी शेतकरी उपस्थित होते.

प्रकल्पात जैविक पद्धतीने गुलाबी बोंड अळीचे एकात्मिक कीड व्यवस्थापनाद्वारे प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शन व संबंधित निविष्ठा वितरित करण्यात येतात.
- डॉ. डी. एस. मुटकुळे, प्रकल्प समन्वयक, बदनापूर, जि. जालना.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com