Banana Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Crop Insurance : केळी पीकविमा मिळेपर्यंत पुढाऱ्यांना ‘गावबंदी’

Crop Insurance Update : हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सुमारे ८१ हजार केळी उत्पादक शेतकऱ्यांनी फळ पीकविमा काढला होता. मात्र अद्यापपर्यंत निम्म्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांना या विम्याची रक्कम मिळालेली नाही.

Team Agrowon

Jalgaon News : हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सुमारे ८१ हजार केळी उत्पादक शेतकऱ्यांनी फळ पीकविमा काढला होता. मात्र अद्यापपर्यंत निम्म्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांना या विम्याची रक्कम मिळालेली नाही.

परतावा मिळत नाही तोपर्यंत गावात कुठल्याही पुढारी, लोकप्रतिनिधी, नेत्यास प्रवेश दिला जाणार नाही, असा निर्णय तांदलवाडी (ता. रावेर, जि. जळगाव) येथील विमाधारक केळी उत्पादकांनी घेतला आहे.

सप्टेंबरपर्यंत ही रक्कम शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित होते. मात्र विमा कंपनीकडून मनमानी कारभार सुरू आहे. रावेर, मुक्ताईनगर परिसरातील १० ते १५ हजार शेतकऱ्यांना या नुकसानीची रक्कम अद्यापही मिळाली नाही, असा संताप शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

या प्रकरणी राजकीय पदाधिकारी, तक्रार निवारण समिती, प्रशासन व विमा कंपनीदेखील दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे या विम्यापासून वंचित शेतकऱ्यांनी नुकतीच बैठक घेतली. ‘‘मुख्यमंत्री, कृषिमंत्र्यांबरोबर बैठक घेऊन मार्ग काढू,’’ असे आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले.

केळी पीकविमा मिळेपर्यंत राजकीय नेत्यांना गावबंदी व मतदानावर बहिष्कार राहील. सर्व पुढारी, खासदार, आमदार, राजकीय पक्षाचे नेते यांना गावबंदी घातली आहे. गुरुवारी (ता. ४) गावाच्या वेशीवर परिसरातील सर्व शेतकऱ्यांकडून बॅनर लावण्यात येतील.
अंबर चौधरी, शेतकरी, तांदलवाडी, जि. जळगाव.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mumbai APMC: मुंबई बाजार समितीच्या कारभाराची होणार चौकशी

Israel Lebanon Conflict: लेबनॉनमध्ये युद्धविराम नाही

White Grub Pest Management: हुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शन मोहीम

Central Government Policy: कांदा, साखर उद्योगांबाबत बुधवारपर्यंत केंद्र निर्णय घेईल : आमदार दिलीप वळसे पाटील

Soybean Oil Demand: अमेरिकेत जैवइंधनासाठी सोयातेलाचा वापर वाढता

SCROLL FOR NEXT