Farmers Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Farmers Protest : सरकार आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा करण्यास तयार; केंद्रीय मंत्री गोयल यांचा दावा

Aslam Abdul Shanedivan

Pune News : हमीभाव कायद्यासह इतर मागण्यांसाठी हरियाणा आणि पंजाबमधील शेतकरी १३ फेब्रुवारीपासून आंदोलन करत आहेत. संयुक्त किसान मोर्चा आणि किसान मजदूर मोर्चाच्या (बिगर-राजकीय) नेतृत्वाखाली हजारो शेतकरी शंभू आणि खनौरी सीमेवर आंदोलनास बसले आहेत. गेल्या सहा महिन्यापासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या हरियाणा सरकार आता शेतकरी नेत्यांशी चर्चा करायला तयार असल्याचा दावा केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केला आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी सरकारचे दरवाजे खुले असल्याचेही गोयल यांनी म्हटले आहे. यानंतर आता गोयल यांनी विधानसभा निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांची नाराजी ओढावू नये म्हणून असा दावा केल्याचे शेतकऱ्यांमध्ये बोलले जात आहे. 

शेतकऱ्यांचा गट असंतुष्ट 

यावेळी गोयल म्हणाले की, शेतकऱ्यांच्या हिताच्या उपाययोजनांसाठी सरकार काम करत आहे. सरकार शेतकरी हितासाठी चर्चा करण्यास सदा तयार आहे. देशभरातील शेतकरी आनंदी असून मोदी सरकारला ते पाठिंबा देत आहेत. अन्यथा एवढा मोठा जनादेश घेऊन आम्ही परत सत्तेत येऊ शकलो नसतो. पण शेतकऱ्यांचा अतिशय छोटा गट तो असंतुष्ट असल्यावर गोयल यांनी भर दिला. तर यूपीएने आपल्या सरकारच्या १० वर्षात काय केले? मी त्यांच्या सरकारची १० भाषणे वाचली आहेत. हमीभाव कायदा आणण्याबाबत त्यांनी कधीही उल्लेख केला नाही. गरिबांच्या उन्नतीसाठी ते कधी बोलले नाहीत, असा आरोप गोयल यांनी काँग्रेसवर केला. 

विधानसभा निवडणूक

हरियाणात विधानसभेच्या ९० जागा असून काहीच महिन्यात येथे विधानसभा निवडणूक होणार आहेत. याआधी येथे लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला जबर धक्का बसला होता. या धक्क्याने सत्ताधारी भाजप घाबरली असून तर सध्या अपक्ष आमदारांच्या बळावर सरकार चालवले जात आहे. तर आगामी निवडणुकीत लूट, प्रॉपर्टी आयडीत भ्रष्टाचार आणि फॅमिली आयडीच्या समस्यांसह शेतकरी आंदोलन असे महत्वाचे मुद्दे निवडणुकीच्या केंद्रस्थानी असतील. ज्यामुळे पुन्हा एकदा भाजपला नुकसानीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. 

शेतकरी आंदोलनाचा कार्यक्रम

गेल्या आठवड्यात, किसान मजदूर संघर्ष समिती आणि युनायटेड किसान मोर्चाच्या (SKM) (बिगर-राजकीय) बॅनरखाली शेतकरी नेत्यांची दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये राष्ट्रीय परिषद झाली. ज्यामध्ये २० राज्यांतील १५० हून अधिक शेतकरी नेते उपस्थित होते. परिषदेत शेतकरी नेत्यांनी आंदोलनाबाबत पुढील रणनीती सांगताना आंदोलनाच्या कार्यक्रमाच्या तारखा जाहीर केल्या.

आंदोलनाच्या कार्यक्रमाच्या तारखा 

१ ऑगस्ट : नवीन फौजदारी कायद्याच्या प्रती जाळणे आणि जिल्हा मुख्यालयावर निदर्शने

१५ ऑगस्ट : दिल्लीकडे देशव्यापी ट्रॅक्टर मोर्चा, यासाठी शेतकऱ्यांना शंभूसह सीमेवर एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

२१ ऑगस्ट : किसान आंदोलन २.० ला २०० दिवस पूर्ण झाल्याचा उत्सव

३१ ऑगस्ट : शंभू सीमेवर आंदोलनाला २०० दिवस पूर्ण झाल्याचा आनंदोत्सव.

१५ आणि २२ सप्टेंबर : हरियाणातील जिंद आणि पिपली येथे शेतकऱ्यांची रॅली

राहुल गांधी यांची भेट

हमीभाव कायद्यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी शेतकरी आंदोलन करत आहेत. तर शेतकरी दिल्लीत जाण्याची मागणी करत आहेत. मात्र हरियाणा पोलिसांनी रस्त्यांवर खिळे ठोकून बॅरिकेड्स लावले आहेत. त्यामुळे शंभू आणि खनौरी सीमेवर शेतकरी तटस्थ उभे असून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची वाट पाहत आहेत. यादरम्यान अलीकडेच शेतकरी नेत्यांच्या प्रतिनिधींनी काँग्रेस खासदार आणि अकाली दलाचे खासदार हरसिमरत कौर यांच्या उपस्थितीत विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांची भेट घेतली होती. तसेच सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जाब विचारावा अशी विनंती केली होती. त्यानंतर मंगळवारी (ता.२९) राहुल गांधी यांनी मोदी सरकारला चक्रव्युहावरून चांगलेच धारेवर धरत शेतकऱ्यांचा प्रश्न मांडला. तसेच काही काँग्रेस खासदारांनी देखील दोन्ही सभागृहात सरकारला घेरलं होतं.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solar Power : पश्चिम विदर्भातील ६ हजार घरांवर सौर ऊर्जानिर्मिती

Suryaghar Yojana : छत्रपती संभाजीनगर परिमंडलात ३६५३ जणांना सूर्यघर योजनेचा लाभ

Majhi Ladki Bahin Yojana : तुम्ही ताकद द्या, ‘लाडकी बहीण’चा निधी वाढवू

PM Modi In Wardha : मोदींच्या हस्ते अमरावतीतील टेक्स्टटाईल पार्कचं भूमिपूजन; कापूस उत्पादकांना होणार फायदा?

Cotton Bollworm : गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी कीटक मिलन व्यत्यय तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT