Farmer Protest : हमीभाव कायद्यासाठी संसदेत खासगी विधेयक मांडू; राहुल गांधींचा शेतकऱ्यांना आश्वासन

Rahul Gandhi Suport Farmer Protest : हरियाना सरकारच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने 'जैसे थे' चा आदेश दिल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशा पसरली आहे.
Rahul Gandhi Suport Farmer Protest
Rahul Gandhi Suport Farmer ProtestAgrowon
Published on
Updated on

Pune News : पंजाब आणि हरियानाच्या शंभू आणि खनौरी सीमेवर सहा महिन्यापासून शेतकरी आंदोलन करत आहेत. तर बुधवारी (ता.२४) सेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी काँग्रेस नेते तथा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षासह इंडिया आघाडी शेतकऱ्यांच्या बाजूने असून हमीभाव कायद्यासाठी संसदेत खासगी विधेयक मांडू असे आश्वासन दिले. याचदरम्यान हरियाना सरकारच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. ज्यात न्यायालयाने जैसे थे चा आदेश दिल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशा होती. मात्र आता राहुल गांधी यांच्या आश्वासनामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

आज संसदेच्या आवारात किसान मजदूर मोर्चा आणि संयुक्त किसान मोर्चा (बिगर-राजकीय)च्या नेतृत्वाखाली देशभरातील १२ शेतकरी नेत्यांच्या शिष्टमंडळाने राहुल गांधी यांची भेट घेतली. या बैठकीला काँग्रेसचे खासदार केसी वेणुगोपाल, अमरिंदर सिंग राजा वारिंग, सुखजिंदर सिंग रंधवा, गुरजित सिंग औजला, धरमवीर गांधी, डॉ. अमर सिंग, दीपेंद्र सिंग हुड्डा आणि जय प्रकाश उपस्थित होते.

Rahul Gandhi Suport Farmer Protest
Farmer Protest : संसद आवारात शेतकरी नेत्यांना सुरक्षा रक्षकांनी अडवलं? राहुल गांधींना भेटण्यास मनाई

एमएसपीच्या कायदेशीर हमीसह अनेक मुद्द्यांवर शेतकरी नेत्यानी राहुल गांधींना भेटण्याचे ठरवले होते. त्या प्रमाणे संसद परिसरात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आधी शेतकरी संघटनांच्या नेत्यांना पोलिसांनी अडवले होते. मात्र राहुल गांधींसह प्रसारमाध्यमांमधून होणाऱ्या टीकेनंतर पोलिसांना शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींना राहुल गांधी यांच्या भेटीसाठी सोडावे लागले होते.

या बैठकीनंतर शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल म्हणाले की, शेतकरी नेत्यांनी आज संसदेच्या संकुलात राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यांना आमच्या मागण्यांचे पत्र दिले. हमीभाव कायद्यासह अनेक मुद्द्यांवर शेतकरी संघटना अनेक महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. याबाबत संसदेच्या चालू अधिवेशनात खासगी विधेयक आणण्याची मागणी आम्ही केली आहे. तसेच इतर मागण्या काय आहेत याचीही माहिती त्यांना देण्यात आली आहे.

Rahul Gandhi Suport Farmer Protest
Farmer Protest : संसद आवारात शेतकरी नेत्यांना सुरक्षा रक्षकांनी अडवलं? राहुल गांधींना भेटण्यास मनाई

तसेच काँग्रेसच्या जाहिर नाम्याबाबत देखील राहुल गांधी यांना अवगत करून दिले असून आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आम्ही पुन्हा आंदोलन करू. सरकारने अनेक आश्वासने दिली पण ती पूर्ण झाली नाहीत. पण आता संसदेत शेतकऱ्यांचा आवाज उठवणार असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटल्याचे डल्लेवाल म्हणाले.

काय म्हणाले राहुल गांधी?

शेतकरी नेत्यांची भेट घेतल्यानंतर लोकसभेतील राहुल गांधी म्हणाले, "आम्ही आमच्या जाहीरनाम्यात हमीभाव कायद्यासह एमएसपीचा उल्लेख केला होता. याबाबत नुकतीच एक बैठक घेण्यात आली. ज्यामध्ये निर्णय घेण्यात आला की काँग्रेससह इंडिया आघाडीच्या इतर नेत्यांशी बोलून देशातील शेतकऱ्यांच्या मागणीसाठी सरकारवर दबाव आणावा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com