Clean Plant Program Agrowon
ॲग्रो विशेष

Clean Plant Program : फलोत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी केंद्राची १ हजार ७६६ कोटींच्या 'खात्रीशीर रोपं' कार्यक्रमाला मंजुरी

Pest free plants : फळांची उत्पादकता वाढवण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी (ता.९) १ हजार ७६६ कोटींच्या कार्यक्रमाला मान्यता दिली. यात 'खात्रीशीर रोपं' प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी मंजुरी दिली आहे. 

Aslam Abdul Shanedivan

Pune News : देशातील बागायती शेती वाढवण्यासाठी केंद्र सरकारने विविध योजना आखल्या असून आता 'खात्रीशीर रोपं' (स्वच्छ रोपं म्हणजेच कीड रोग विरहीत रोपं (सीपीपी प्रकल्प)) प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी (ता.९) या कार्यक्रमाला मंजुरी दिली. ज्यामध्ये देशात नऊ जागतिक दर्जाची 'खात्रीशीर रोपं' केंद्रे स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर सीपीपी केंद्रांच्या स्थापनेमुळे शेतकरी आणि कृषी अर्थव्यवस्थेला फायदा होईल असा दावा सरकारने केला आहे. तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी फेब्रुवारी २०२३ मध्ये अर्थसंकल्पीय भाषणात सीपीपीची घोषणा केली होती. तसेच फलोत्पादन क्षेत्रात क्रांती घडवून सीपीपी मदत करेल अशी अपेक्षा अर्थमंत्र्यांनी बोलून दाखवली होती. 

सीपीपी देशभरातील फळ पिकांची गुणवत्ता आणि उत्पादकता वाढविण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण उपक्रम आहे. तर या उपक्रमासाठी १ हजार ७६६ कोटींचा खर्च अपेक्षित असून यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल, असे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आपल्या दाव्यात म्हटले आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाद्वारे राबविण्यात येत असलेल्या या कार्यक्रमाचा उद्देश फलोत्पादन पिकांमध्ये विषाणू संसर्गाचा सामना करण्याची क्षमता, उत्पादकता आणि गुणवत्ता वाढवण्याचा असल्याचेही वैष्णव म्हणाले. 

सीपीपी कार्यक्रमांतर्गत ९ केंद्रं ही 'खात्रीशीर रोपं' केंद्र म्हणून विकसित केली जाणार आहेत. यात द्राक्षे, सफरचंद, बदाम, अक्रोड, लिंबूवर्गीय फळे, आंबा, पेरू, एवोकॅडो, लिची आणि डाळिंब ही प्रमुख फळे असतील असेही वैष्णव म्हणाले. तसेच गेल्या १० वर्षात ५०, ००० कोटींहून फलोत्पादनाची निर्यात अधिक झाली असून शेतकऱ्यांना उत्पन्नाचा चांगला स्रोत मिळाला आहे. तर ग्राहकांनाही पोषण मिळत असल्याचा दावा वैष्णव यांनी केला आहे. 

तसेच मंत्रिमंडळाने शुक्रवारी पीएम जीवन कार्यक्रमाच्या विस्ताराला मंजुरी दिली. यामध्ये १९०० कोटी रुपये खर्चून बायोमासपासून इथेनॉलच्या उत्पादनाला आणखी पाच वर्षांनी प्रोत्साहन देण्यात येणार असल्याचा दावा वैष्णव यांनी केला आहे. वैष्णव यांच्या मते, यामुळे देशात इथेनॉलचे उत्पादन वाढण्यास आणि पेट्रोलचे मिश्रण वाढण्यास मदत होईल. दहा वर्षांपूर्वी, मिश्रणाचा दर १.५ टक्के होता, तर जुलै २०२४ मध्ये, मिश्रणाची टक्केवारी १६ पर्यंत वाढवण्यात आली. तर एव्हिएशन टर्बाइन इंधनात इथेनॉलचेही मिश्रण केले जाईल, असे ते म्हणाले. तर इथेनॉलमध्ये पेट्रोल मिसळणे हा भारतातील तेल आयातीचे प्रमाण कमी करण्यात मदत करण्यासाठी महत्वाचे पाऊस असून तांदूळ, मका आणि बायोमासपासून इथेनॉल तयार करता येते. ५ जून २०२१ रोजी पंतप्रधान मोदी यांनी २०२५ पर्यंत पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल-मिश्रणाचे लक्ष्य ठेवले आहे. 

'खात्रीशीर रोपं' कार्यक्रम (CPP)  काय आहे? 

पीआयबीच्या माहितीनुसार 'खात्रीशीर रोपं' कार्यक्रम म्हणजेच स्वच्छ रोप कार्यक्रम (सीपीपी) विषाणूमुक्त, उच्च दर्जाची पेरणी सामग्रीच्या उपब्धतेमधून उत्पादनात वाढ आणि सुधारणा.  या कार्यक्रमात रोपवाटिकांचा समावेश असून रोपवाटिकांमधून 'खात्रीशीर रोपं' शेतकऱ्यांपर्यंत पोहचवली जातील. यामुळे रोपवाटिंकाच्या वृद्धीला आणि शाश्वततेला चालना मिळेल. तर या उपक्रमातून  विषाणूमुक्त, उच्च दर्जाच्या, उत्तम चवीच्या आणि पोषणमूल्ये असणारी फळे ग्राहकासाठी उपलब्ध होतील असाही दावा सरकारने केला आहे. तसेच उच्च-गुणवत्तेच्या, रोगमुक्त फळांचे उत्पादन करून भारत अग्रगण्य जागतिक निर्यातदार म्हणून आपले स्थान मजबूत करेल, बाजारपेठेच्या संधी विस्तृत करेल आणि आंतरराष्ट्रीय फळ व्यापारात आपला वाटा वाढवेल असाही दावा या कार्यक्रमावरून सरकारने केला आहे. 

तसेच हा कार्यक्रम राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाद्वारे भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) च्या सहकार्याने राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या  नियोजन आणि अंमलबजावणीमध्ये महिला शेतकऱ्यांना सक्रीय पद्धतीने सहभागी करून घेण्यात येईल. ज्यामुळे महिला शेतकऱ्यांना साधनसंपत्ती, प्रशिक्षण आणि निर्णयक्षम संधी उपलब्ध होतील असाही दावा सरकारने केला आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Productivity : शासकीय खरेदीसाठी सोयाबीनची उत्पादकता जाहीर

Vidhansabha Election Result 2024 : लातूर,धाराशिवकरांची महायुतीला पसंती

Gokul Milk : कोल्हापुरात महाडिक पॅटर्न; आता ‘गोकुळ’ निशाण्यावर

Jalgaon Assembly Election Result 2024 : खानदेशात महायुतीची मुसंडी; काँग्रेसचे दिग्गज पराभूत

Rohit Patil NCP-SP : राज्यातला सर्वात तरूण आमदार राष्ट्रवादीचा; वय अवघे...

SCROLL FOR NEXT