Pune News : देशातील मत्स्यपालनाला चालना देण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान आणि पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय आणि दुग्धव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ लालन सिंह यांच्यात बैठक झाली. ही बैठक रविवारी (ता.२२) कृषी भवन, दिल्ली येथे झाली. या समितीमध्ये मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालय आणि आयसीएआरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असेल, अशाही माहिती शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे.
यावेळी शिवराज सिंह म्हणाले, देशातील मत्स्यपालनाला चालना देण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये दुग्धव्यवसाय मंत्रालय आणि आयसीएआरचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असेल. तर नियमित बैठकांमधून रोडमॅप देखील तयार केला जाईल. तसेच या कामासाठी राज्यांची मदत घेतली जाईल, असेही शिवराज सिंह चौहान म्हणाले.
आयसीएआर मत्स्यपालन क्षेत्रात चांगले संशोधन करत असून नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याबरोबरच अनेक उपक्रम सुरू करण्यात आली आहेत. याचा लाभ देशभरातील शेतकऱ्यांना देण्यासाठीच ही बैठक बोलवण्यात आली आहे. त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आली असून यावर लालन सिंह यांच्याशी चर्चा केल्याचे शिवराज सिंह चौहान म्हणाले.
देशात मत्स्यव्यवसाय क्षेत्राच्या विकासासाठी वाव असून रोजगाराच्या संधीही मोठ्या प्रमाणात आहेत. या दिशेने सर्व संबंधित विभाग एकत्रितपणे काम करतील. ते अंमलबजावणी करतील. यशस्वी शेतकरी, पशुपालक आणि मच्छीमार यांच्यापर्यंत जनजागृती कार्यक्रम आणि शिबिरेही पोहचवली जातील. सरकारची इच्छा लहान शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करण्याची असून मॉडेल फार्म विकसित केले जातील. यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, गरिबी दूर करणे आणि शेती आणि संबंधित क्षेत्रातील लोकांचे उत्पन्न वाढवण्यावर भर दिला जाईल. यासाठी अनेक योजना आणि कार्यक्रम आखले असून काम केले जात असल्याचेही शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले.
मत्स्य उत्पादनात भारत दुसऱ्या क्रमांकावर
यावेळी केंद्रीय मंत्री ललन सिंह यांनी, मत्स्यपालनात आयसीएआरचे संशोधन अतिशय उपयुक्त आहे. हेच संशोधन शेतकरी, नव्या स्टार्टअपपर्यंत नेण्याचा उद्देश या बैठकीचा होता. मत्स्य उत्पादनात निळी क्रांती झाली असून आज भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारत दरवर्षी ६० हजार कोटी रुपयांची मासळी निर्यात करतो. सध्या भारत दुसऱ्या क्रमांकाचा निर्यात दार आहे. तर देशातील शेतकऱ्यांनाही प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचा लाभ मिळत असल्याचे लालन सिंह म्हणाले.
यावेळी दूध उत्पादनात भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. निर्यात वाढवण्यासाठी आणि देश एफएमडी मुक्त करण्यासाठी केंद्र सरकार काम करत, असल्याचे लालन सिंह म्हणाले. यावेळी आयसीएआरचे उपमहासंचालक (मत्स्य विज्ञान) डॉ.जे.के. जेना यांनी ८ मत्स्य संशोधन संस्थांच्या संशोधनांचे सादरीकरण केले. या बैठकीला मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव डॉ. अभिलाक्ष लेखी आणि आयसीएआरचे महासंचालक डॉ. हिमांशू पाठक उपस्थित होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.