Shivraj Singh Chauhan Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Season : केंद्रीय कृषिमंत्री चौहान यांनी घेतला खरिपाच्या तयारीचा आढावा

Shivraj Singh Chauhan : केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आगामी खरीप हंगामासाठी खते, बियाणे आणि कीटकनाशकांची वेळेवर उपलब्धता सुनिश्चित करण्याची गरज व्यक्त केली.

Team Agrowon

New Delhi News : केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आगामी खरीप हंगामासाठी खते, बियाणे आणि कीटकनाशकांची वेळेवर उपलब्धता सुनिश्चित करण्याची गरज व्यक्त केली.

कृषी भवनात विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत खरीप हंगाम २०२४ च्या तयारीचा आढावा त्यांनी शनिवारी (ता. १५) घेतला. त्या वेळी चौहान यांनी पिकांसाठी निविष्ठा सामग्रीचे वेळेवर वितरण आणि दर्जेदार पुरवठा सुनिश्चित करण्याच्या सूचना दिल्या.

या वेळी खत विभाग, केंद्रीय जल आयोग आणि भारतीय हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सादरीकरण केले. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे सचिव मनोज आहुजा आणि मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्र्यांना खरीप हंगामाच्या तयारीची माहिती दिली.

कृषिमंत्री चौहान म्हणाले, की पुरवठा साखळीतील कोणत्याही व्यत्ययामुळे पेरणीला विलंब होतो. यामुळे उत्पादनात व्यत्यय येतो. ते कोणत्याही परिस्थितीत टाळले पाहिजे. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, यासाठी चौहान यांनी संबंधित विभागाला सतत देखरेख आणि परिस्थितीचा आढावा घेण्याचे निर्देश दिले. यंदाच्या हंगामाबाबत ते म्हणाले, की यंदा मोसमी पावसाचा अंदाज नेहमीपेक्षा चांगला आहे.

तत्पूर्वी, कृषी संशोधन आणि शिक्षण विभागाच्या (डीएआरई) कामकाजाचा आढावा घेताना, चौहान यांनी कृषी उत्पादकता सुधारण्यासाठी शेतात यांत्रिकीकरण वाढविण्याचे आवाहन केले. कृषी शिक्षणाला व्यवसायाशी जोडण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

त्यांनी किसान विकास केंद्रांची (KVKs) उपयुक्तता सुधारण्यासाठी सखोल चर्चा करण्यावर भर दिला. तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरामुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडू शकते, असे ते म्हणाले. त्यांनी शास्त्रज्ञांना उत्पादकता सुधारण्यासाठी आणि नवीन जाती विकसित करण्यासाठी सतत काम करण्याचे आवाहन केले.

चौहान म्हणाले, की नैसर्गिक शेती पद्धती सुलभ करण्याची गरज आहे. कृषी संशोधन आणि शिक्षण विभागाचे सचिव आणि भारतीय कृषी संशोधन केंद्राचे (आयसीएआर) महासंचालक हिमांशू पाठक यांनी मंत्री चौहान यांना भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (आयसीएआर) उपक्रम आणि १०० दिवसांच्या योजनेची माहिती दिली. बैठकीला कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर आणि भगीरथ चौधरी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT