Kharif Season : बियाणे, खतांची साठेबाजी होत असल्यास करा व्हॉट्‍सॲप

Seed Linking : राज्यात चालू खरीप हंगामासाठी खते, कीटकनाशके व बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.
Kharif Season
Kharif SeasonAgrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यात चालू खरीप हंगामासाठी खते, कीटकनाशके व बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. मात्र साठेबाजी किंवा लिंकिंग होत असल्यास शेतकऱ्यांनी व्हॉट्‍सॲपद्वारे तक्रार करावी, असे आवाहन कृषी आयुक्तालयाने केले आहे.

निविष्ठांची कृत्रिम टंचाई करीत शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केल्यास कारवाईचा इशारा प्रभारी कृषी आयुक्त रावसाहेब भागडे यांनी दिला होता. त्यानंतर आता कृषी संचालक विकास पाटील यांनीही कृषी आयुक्तालयात उघडण्यात आलेल्या नियंत्रण कक्षाचाही त्यांनी आढावा घेतला. खरीप हंगामात निविष्ठा व गुणनियंत्रण कामकाजाबाबत दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.

Kharif Season
Kharif Season : पावसाळापूर्व खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग वाढली

निविष्ठांची गुणवत्ता, किंमत, साठेबाजी किंवा लिंकिंगबाबत शेतकऱ्यांना अडचणी येतात. परंतु तक्रार नेमकी कुठे करायची असा मुद्दा उद्‍भवतो. त्यामुळेच राज्यभरातील तक्रारींची एकत्रित दखल घेण्यासाठी नियंत्रण कक्ष उघडण्यात आला आहे.

Kharif Season
Kharif Season : बियाणे, खतांची अनधिकृत विक्री केल्यास कारवाई

कक्षाचे काम सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत बारा तास चालू आहेत. त्यासाठी कृषी अधिकाऱ्यांना नियुक्त करण्यात आले आहे. हा कक्ष येत्या ३० सप्टेंबरपर्यंत चालू राहील.

तक्रार नोंदविण्यासाठी असे आहेत पर्याय

व्हॉट्‍सॲपद्वारे तक्रार देण्यासाठी ः ९८२२४४६६५५

भ्रमणध्वनीद्वारे तक्रार देण्यासाठी ः १८००२३३४०००

ई-मेलद्वारे तक्रार देण्यासाठी ः controlroom.qc.maharashtra@gmail.com

...अशी नोंदवा व्हॉट्‍सॲपद्वारे तक्रार

- निविष्ठाविषयक गुणवत्ता, किंमत, साठेबाजी व लिंकिंग याबाबत तक्रारीचा संक्षिप्त तपशील आधी साध्या कागदावर लिहावा.

- तक्रारीत शेतकऱ्याने नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, समस्या नमूद करावी.

- तक्रार लिहिलेल्या कागदाचे छायाचित्र काढून ते आयुक्तालयाकडे व्हॉट्‍सॲपद्वारे ९८२२४४६६५५ या क्रमांकावर पाठवावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com