Agricultural Exhibition Agrowon
ॲग्रो विशेष

Agricultural Advice : उत्पादन वाढीसाठी उसाचे शरीरशास्त्र समजून घेणे गरजेचे

Team Agrowon

Sangli News : माती, पाणी परीक्षणासह ऊस पिकाचे शरीरशास्त्र व अन्नद्रव्ये व्यवस्थापन समजून घेऊन ऊस शेती केल्यास अपेक्षित उत्पादनक्षमता गाठता येईल, असे प्रतिपादन कोल्हापूर येथील विभागीय कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. अशोक पिसाळ यांनी केले.

‘सकाळ- ॲग्रोवन’तर्फे आयोजित विभागीय कृषी प्रदर्शनात ऊस उत्पादनवाढीची सूत्रे या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. डॉ. पिसाळ म्हणाले, की उसाच्या एकरी उच्च किंवा विक्रमी उत्पादनासाठी जमिनीच्या पूर्वमशागतीपासून ते तोडणीपर्यंतचे नियोजन महत्त्वाचे आहे. त्यासाठी दर्जेदार रोपांची निवड, लागवड पद्धत, अधिक उत्पादनक्षम वाण, खत व पाणी व्यवस्थापन आदी बाबी महत्त्वाच्या आहेत. कमीत कमी कालावधीत उगवण होण्यासाठी रोपलावण फायदेशीर ठरते. ११० ते १२० दिवसांपासून २४० दिवसांपर्यंतचा कालावधी उसाच्या जोमदार वाढीचा असतो. या काळात अत्यंत काटेकोरपणे केलेले व्यवस्थापन महत्त्वाचे ठरते.खंताचा स्फुरद, पालाश खत व्यवस्थापन करावे.

एकरी शंभर टन उत्पादनात सातत्य ठेवलेले नागेवाडी (ता. खानापूर, जि. सांगली) येथील विकास निकम यांनी अनोख्या शैलीत शेतकऱ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, की ऊस हे आळशी व्यक्तींचे पीक आहे हा गैरसमज काहींनी निर्माण केला आहे. तो काढून टाकणे गरजेचे आहे. ऊसवाढीच्या प्रत्येक टप्प्यावर अत्यंत सूक्ष्म व्यवस्थापन करावे लागते. पिकाकडे दररोज बारकाईने लक्ष द्यायला हवे. त्यातून एकरी शंभर टन उत्पादन घेणे सहज शक्य आहे. त्याचा अनुभव मी स्वतः घेत आहे.

ते पुढे म्हणाले, की जेवढी जमीन सुपीक तेवढे अपेक्षित उत्पादन मिळणे सोपे जाते. याचबरोबर माती परीक्षणानुसार खत व्यवस्थापन व ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे गरजेचे आहे. या वेळी निकम यांनी ऊस शेती व्यवस्थापनातील महत्त्वाच्या बाबी समजावून दिल्या. पीक फेरपालट, हिरवळीच्या पिकांची लागवड, सेंद्रिय कर्ब आदींचे महत्त्व व तंत्र विषद केले. ‘ॲग्रोवन’चे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण यांनी स्वागत केले. अमित गद्रे यांनी सूत्रसंचालन केले.

दहा प्रगतिशील शेतकऱ्यांचा सन्मान

चर्चासत्र झाल्यानंतर सांगली जिल्ह्यातील प्रगतिशील ऊस उत्पादकांचा सहकुटुंब सत्कार करण्यात आला. यामध्ये विजयकुमार पवार, बांबवडे, (ता. पलूस), प्रवीण जाधव, कुंडल, (ता. पलूस), हर्षद चव्हाण, ढवळी, (ता. तासगाव), बाबासाहेब पाटील, लाडेगाव, (ता. वाळवा), विठ्ठल खराडे, हिंगणगाव बुद्रुक, (ता. कडेगाव) राजू मोकळे, वांगी, (ता. कडेगाव), सूरज पवार, वसगडे, (ता. पलूस) यांचा समावेश होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Chitale Dairy : जातिवंत पशुपैदाशीचे तंत्रज्ञान पोहोचविणारी चितळे डेअरी

Fertilizer : निसर्ग क्रॉप केअरची युरोपियन तंत्रज्ञानावर आधारित खते

State Agriculture Corporation Land : वित्त विभागाच्या विरोधाला केराची टोपली? शेती महामंडळाची ५.४८ हेक्टर जमीन शिर्डी संस्थानला मोफत

Onion Cultivation : खानदेशात कांदा रोपवाटिका निर्मितीची तयारी वेगात

BJP Candidate List : महायुतीच्या जागा वाटपाच्या रस्सीखेचात भाजपची बाजी; उमेदवारांची पहिली यादी जाहीर

SCROLL FOR NEXT