Agriculture Exhibition 2024 : ‘ॲग्रोवन’ कृषी प्रदर्शनास सांगलीत थाटात प्रारंभ

Agrowon Exhibition 2024 : नावीन्यपूर्ण शेतीतंत्राबरोबर प्रतिकूल परिस्थितीत शेतीचे व्यवस्थापन सांगणाऱ्या ‘सकाळ-ॲग्रोवन’ विभागीय कृषी प्रदर्शनाचे शुक्रवारी (ता. १८) दिमाखात उद्‌घाटन झाले.
Agricultural Exhibition
Agricultural ExhibitionAgrowon
Published on
Updated on

Sangli News : नावीन्यपूर्ण शेतीतंत्राबरोबर प्रतिकूल परिस्थितीत शेतीचे व्यवस्थापन सांगणाऱ्या ‘सकाळ-ॲग्रोवन’ विभागीय कृषी प्रदर्शनाचे शुक्रवारी (ता. १८) दिमाखात उद्‌घाटन झाले. सोमवारअखेर (ता.२१) सांगली-मिरज रस्त्यालगत असणाऱ्या अंबाबाई तालिम संस्थेच्या मैदानात हे प्रदर्शन होत आहे.

निसर्ग क्रॉप केअर इंडिया प्रा. लि. प्रस्तुत ‘सकाळ-ॲग्रोवन’ ॲग्री पॉवर्ड बाय गोदरेज ॲग्रोवेट, नेचर केअर फर्टिलायझर्स प्रा. लि, मे. बी. जी. चितळे डेअरी, भिलवडी आहेत. तर धानुका ॲग्रीटेक लि, व आयडियल ॲग्री सर्च प्रा. लि. व वारणा सहकारी दूध संघ हे सहप्रायोजक आहेत. किसान ड्रोन गिफ्ट पार्टनर तर रेडिओ पार्टनर बीग एफएम आहेत.

Agricultural Exhibition
Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्या सांब्रा (जि. बेळगाव) जोई या शेतकरी कुटुंबाच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्‌घाटन करण्यात आले. या कुटुंबातील सदस्य इराप्पा जोई, सुधीर जोई, सुभाष जोई, करण जोई, पलक जोई, पूजा जोई, शांता जोई, आरती जोई, आदित्य जोई, आर्यन जोई यांनी फीत कापून उद्‌घाटन केले.

‘ॲग्रोवन’चे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण, सकाळ कोल्हापूरचे संपादक निखिल पंडितराव, सहयोगी संपादक शेखर जोशी, सकाळचे सरव्यवस्थापक (वितरण) रवींद्र रायकर, ॲग्रोवनचे निवासी संपादक रमेश जाधव, उपसरव्यवस्थापक (बिझनेस) बाळासाहेब खवले, सहायक सरव्यवस्थापक संभाजी घोरपडे, सकाळचे (कोल्हापूर) युनिट हेड यतीश शहा, सकाळचे व्यवस्थापक (जाहिरात) उदय देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Agricultural Exhibition
Agricultural Exhibition : सांगलीत होणार कृषी तंत्रज्ञानाचा जागर

निसर्ग क्रॉप केअर इंडिया प्रा. लि चे संचालक सुभाष पिसाळ, चंद्रकांत खरमाटे, गोदरेज ॲग्रोवेट, प्रॉडक्ट मॅनेजर डॉ. संचित मंडपे, नेचर केअर फर्टिलायझर्स प्रा. लि.चे कार्यकारी संचालक जयदेव बर्वे, मे. बी. जी. चितळे डेअरी, भिलवडीचे संचालक मकरंद चितळे, धानुका ॲग्रीटेक लि.चे विभागीय अधिकारी निखिल मोहिते, अक्षय कदम, आयडियल ॲग्री सर्च प्रा. लि.चे कार्यकारी संचालक प्रकाश औताडे, वारणा सहकारी दूध संघाचे विक्री अधिकारी स्वप्नील वाघमारे, किसान ड्रोनचे पुणे जिल्हा विक्रेता विक्रम पानसरे, सांगली-मिरज महापालिकेचे आरोग्य अधिकारी रवींद्र ताटे, डॉ. माधवी पटवर्धन, सिद्धिविनायक हिरोचे संचालक श्रीकांत तारळेकर आदींच्या उपस्थितीत प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.

श्री. चव्हाण म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांची सोय आणि सेवेसाठी ॲग्रोवन राज्यभर प्रदर्शन आयोजित करते. अनेक कृषी उत्पादक कंपन्या त्यासाठी पाठीशी उभ्या राहतात. शेतकऱ्यांच्या व्यापक हिताचा आपण मिळून विचार करतो. भविष्यातही करत राहू. ॲग्रोवन दैनिकातून, परिषदांमधून आणि दिवाळी अंकातून शेतकऱ्यांना ज्ञान देण्याचा प्रयत्न करीत आहे.’’ सुभाष पिसाळ म्हणाले, की ॲग्रोवनमुळे अनेक शेतकऱ्यांचे आयुष्य बदलले आहे. या प्रदर्शनाचाही अनेक शेतकरी बांधवांना चांगला उपयोग होणार आहे.

प्रदर्शनातील विविध स्टॉलच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद होत आहे. विविध पिकांच्या व्यवस्थापनासाठीची औषधे, नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान यांचा मेळा या निमित्ताने भरला आहे. सध्या अवेळी पाऊस व अन्य प्रतिकूल हवामानामुळे प्रत्येक शेतकरी अडचणीत आहेत. यावरील उपाय शोधण्यासाठी शेतकऱ्यांनी या प्रदर्शनात पहिल्या दिवशी गर्दी केली होती. सेंद्रिय शेती, एकात्मिक शेतीसह नावीन्यपूर्ण शेतीचा मंत्र या प्रदर्शनातून मिळणार आहे. याचबरोबर विविध व्याख्यानांद्वारेही शेतकऱ्यांशी थेट संवाद होणार आहे. औषध फवारणीसाठी मनुष्यबळ वाचवणारा प्रमुख उपाय म्हणून पुढे आलेल्या ड्रोनच्या वापराबाबतही पहिल्या दिवशी शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता दिसली. जुन्या शेतकऱ्यांबरोबर शेतीत करिअर घडवणाऱ्या युवा शेतकऱ्यांनी ही पहिल्या दिवशी प्रदर्शनास हजेरी लावली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com