RTE Admission Agrowon
ॲग्रो विशेष

RTE Admission Process : आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत जागा २० हजार परंतू प्रवेश १३ हजारच

Team Agrowon

Vardha News : आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत यंदा विदर्भात अत्यल्प प्रवेश झाले आहेत. विदर्भातील अकरा जिल्ह्यांत मोफत प्रवेशासाठी यंदा एकूण २०,६४८ जागा राखीव आहेत. मात्र त्यातील केवळ १३,७०६ जागांवरच प्रवेश झाले आहेत.

आरटीईअंतर्गत खासगी विनाअनुदानित इंग्रजी शाळांमध्ये २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश दिले जातात. वंचित, दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना या जागांवर प्रवेश दिला जातो आणि त्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क शासनाकडून संबंधित शाळांना अदा केले जाते. दर वर्षी शाळा सुरू होण्यापूर्वीच आरटीईची प्रवेश प्रक्रिया सुरू होते.

परंतु, यंदा शाळा सुरू झाल्यावर दीड महिन्याने ही प्रक्रिया सुरू झाली. तोपर्यंत अनेक पालकांनी पैसे भरून पसंतीच्या शाळेत आपल्या पाल्यांचे प्रवेश केले होते. आरटीईसाठी जून महिन्यातच ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. हजारो पालकांनी अर्ज दाखल केले. मात्र सोडतीचा निकाल जुलै अखेरीस जाहीर करण्यात आला.

त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश निश्चितीची प्रक्रिया राबविण्यात आली. अखेरच्या मुदतीपर्यंत विदर्भात सुमारे ६६ टक्के विद्यार्थ्यांनीच प्रवेश निश्चित केले आहेत. यंदा विदर्भात २०६४८ जागांवर मोफत प्रवेश देण्यात येणार आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. मात्र, अखेरच्या मुदतीपर्यंत १३ हजार ७०६ जागांवरच प्रवेश झाले आहेत.

पुरेशा जागांवर प्रवेश झाले नसल्याने वेटिंग लिस्टमधील विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली आहे. पहिल्या वेटिंग लिस्टमधील विद्यार्थ्यांना २६ ऑगस्टपर्यंत प्रवेशाची संधी देण्यात आली आहे. यानंतरही जागा रिक्त राहिल्यास दुसऱ्या वेटिंग लिस्टमधील विद्यार्थ्यांना संधी देण्यात येणार असल्याची माहिती आहे.

विदर्भातील आरटीईच्या जागा आणि निश्चित झालेले प्रवेश

जिल्हा जागा निश्चित प्रवेश टक्केवारी

अमरावती २३०० १५१३ ६६ टक्के

अकोला १९१८ १४१९ ७४ टक्के

यवतमाळ १८४२ १२४१ ६७ टक्के

बुलडाणा २४११ १७५६ ७३ टक्के

वाशीम ८७१ ५८० ६७ टक्के

चंद्रपूर १४१२ ९९७ ७१ टक्के

गडचिरोली ४२४ ३१५ ७४ टक्के

भंडारा ७६० ५३२ ७० टक्के

गोंदिया ८८३ ६२४ ७१ टक्के

नागपूर ६६४८ ३९३७ ५९ टक्के

वर्धा ११७९ ७९२ ६७ टक्के

@विदर्भ एकूण २०६४८ १३७०६ ६६ टक्के

@ राज्य ९३०३२ ६११८९ ६६ टक्के

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT