Maharashtra Election Agrowon
ॲग्रो विशेष

Sindkhedraja Assembly Constituency : सिंदखेडराजात काका-पुतणी रिंगणात

Maharashtra Election 2024 : राज्यात बऱ्याच ठिकाणी काका-पुतण्या किंवा नातेसंबंधांतील लढती होत आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा मतदार संघातही काका-पुतणी अशी लढत होत आहे.

Team Agrowon

Akola News : राज्यात बऱ्याच ठिकाणी काका-पुतण्या किंवा नातेसंबंधांतील लढती होत आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा मतदार संघातही काका-पुतणी अशी लढत होत आहे. काका म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे व पुतणी म्हणजे गायत्री गणेश शिंगणे. गायत्री या अपक्ष उमेदवार म्हणून पहिल्यांदाच रिंगणात उतरल्या आहेत. तर शिंगणे या मतदार संघाचे सातत्याने विधानसभेत प्रतिनिधीत्व करीत आले आहेत.

सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघामध्ये यंदा तुल्यबळ तिरंगी लढतीबरोबरच महायुतीमध्येही मैत्रीपूर्ण लढती होत आहेत. महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून (शरदचंद्र पवार गट) डॉ. राजेंद्र शिंगणे, महायुतीकडून शिवसेनेचे (एकनाथ शिंदे गट) माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर व राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) मनोज कायंदे हे प्रमुख उमेदवार आहेत.

याशिवाय वंचित बहुजन आघाडीकडून सविता मुंडे, स्वतंत्र भारत पक्ष दत्तात्रय काकडे, राष्ट्रीय समाज पक्ष प्रा. दत्तू चव्हाण, जनहित लोकशाही पक्ष डॉ. सुरेश घुमटकर आणि अपक्ष गायत्री शिंगणे विधानसभेच्या रिंगणामध्ये आहेत.

या मतदार संघात डॉ. शिंगणे यांच्याविरुद्धच सर्व उमेदवारांची लढत आहे. मतदार संघात गावोगावी शिंगणे यांनी पकड मिळवलेली आहे. गेल्या काळात ते अजित पवारांसोबत गेले होते. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी वाऱ्याची दिशा पाहत शरद पवार गोटाला पसंती दिली.

त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) कडून हातोहात उमेदवारीही मिळाली. मात्र, डॉ. शिंगणे ज्या काळात अजित पवारांसमवेत गेलेले होते, त्या वेळी या मतदार संघात गायत्री शिंगणे यांचे तरुण नेतृत्व पुढे आले होते. गायत्री यांना येथे उमेदवारी मिळेल, अशी शक्यताही वर्तवली जात होती.

मात्र, घडले उटलेच. येथे तिचे काका पक्षात परतल्याने व उमेदवारीही मिळाल्याने गायत्री शिंगणे यांच्यापुढे पेच तयार झाला. तरीही समर्थकांच्या आग्रहाने त्यांनी दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही. अपक्ष म्हणून त्या आता काकांना किती लढत देतात हे निकालानंतर स्पष्ट होईल.

या मतदार संघात प्रमुख उमेदवार तगडे असल्याने मत विभाजनाची मोठी शक्यता वर्तवली जात आहे. अशा स्थितीत मतदार कुणाला कौल देतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सिंदखेडराजामध्ये मराठा, वंजारी, माळी समाजाचे मतदार सर्वाधिक आहेत. तर दलित, मुस्लिम, बंजारा, धनगर, अल्पसंख्याक यासह इतर समाजाच्या मतदानावर विजयाचे सूत्र अवलंबून राहणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Supriya Sule : आमदार विकत घेता येतात, मग शेतकऱ्यांसाठी पैसे का खर्चत नाही

Voting Awareness : अकलूजला मानवी साखळीद्वारे मतदान जनजागृती

Krushna Valley Water : कृष्णा खोऱ्यातील पाणी डिसेंबरअखेर तुळजापुरात

Sugarcane Season 2024 : ‘कादवा’चे यंदा साडेचार लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट

Water Storage : सांगलीतील प्रकल्पांत ८१ टक्के पाणीसाठा

SCROLL FOR NEXT