Maharashtra Assembly Election 2024 : मतदानासाठी १२ प्रकारचे पुरावे ग्राह्य

12 types of identity proof required for voting : मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्र जवळ नसल्यास अन्य १२ पुरावे ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले आहे.
Maharashtra Assembly Election 2024
Maharashtra Assembly Election 2024Agrowon
Published on
Updated on

Pune News : मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्र जवळ नसल्यास अन्य १२ पुरावे ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले आहे. त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर संबंधितांना मतदान करता येईल, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे. मतदान केंद्रात मोबाइल घेऊन जाण्यास बंदी असल्याचेही ते म्हणाले.

पुणे जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीअंतर्गत २० नोव्हेंबर रोजी २१ मतदार संघांत मतदान होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी ही माहिती दिली. छायाचित्र असलेले मतदार ओळखपत्र आहे, अशा मतदारांनी मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्र सादर करावे.

Maharashtra Assembly Election 2024
Maharashtra Assembly Election : ‘स्वावलंबी, स्वाभिमानी महाराष्ट्र उभारणार’

छायाचित्र असलेले मतदार ओळखपत्र सादर करू शकणार नाहीत अशा मतदारांची ओळख पटविण्यासाठी निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या १२ पैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे. यामध्ये आधार कार्ड, मनरेगाअंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र (जॉब कार्ड), बँक किंवा टपाल कार्यालयाने दिलेले छायाचित्र असलेले पासबुक, श्रम मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत दिलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड,

वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), स्थायी खाते क्रमांक (पॅन कार्ड), राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीअंतर्गत भारताचे महानिबंधक (आरजीआय) यांनी दिलेले स्मार्ट कार्ड, भारतीय पारपत्र (पासपोर्ट), छायाचित्र असलेली निवृत्तीवेतनविषयक कागदपत्रे, केंद्र अथवा राज्य शासन, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम,

Maharashtra Assembly Election 2024
Maharashtra Assembly Election : आजपासून प्रचाराची रणधुमाळी

सार्वजनिक मर्यादित कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले, छायाचित्र असलेले सेवा ओळखपत्र, संसद, विधानसभा, विधान परिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाच्या वतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र या १२ पुराव्यांचा समावेश आहे. मतदारांनी मतदान केंद्रावर जाताना मतदार माहिती चिठ्ठी आणि मतदार छायाचित्र ओळखपत्र असल्यास मतदार ओळखपत्र किंवा वरील १२ पैकी कोणताही एक पुरावा बरोबर न्यावा.

मतदान केंद्राध्यक्षांच्या सूचनांचे पालन करावे

मतदानाचे चित्रीकरण, छायांकन करून गोपनीयता भंग करणे हा निवडणूक विषयक गुन्हा आहे. त्यादृष्टिने मतदान केंद्रात मोबाइल घेऊन जाण्यास बंदी आहे. मतदानावेळी मतदान केंद्रात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, मतदानाची गोपनीयता भंग होऊ नये, यासाठी मतदारांनी मतदान केंद्रात मोबाइल घेऊन जाऊ नये. मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांच्या सूचनांचे तंतोतंत पालन व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com