Agriculture Irrigation Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Irrigation : उजनीतून शेतीसाठी सोडलेले पाणी २५ मेनंतर बंद होणार

Ujani Dam Irrigation : उजनी धरणातील पाणी उणे २० टक्क्यांपर्यंत आल्याने शेतीसाठी कालव्यातून सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग २५४० क्युसेकवरून १९५० पर्यंत कमी झाला आहे.

Team Agrowon

Solapur News : उजनी धरणातील पाणी उणे २० टक्क्यांपर्यंत आल्याने शेतीसाठी कालव्यातून सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग २५४० क्युसेकवरून १९५० पर्यंत कमी झाला आहे. त्यामुळे शेतीसाठी सोडण्यात येणारे पाणी येत्या २५ मेपासून बंद केले जाणार आहे.\

गेल्या काही दिवसांपासून उजनीतील पाणीपातळी वरचेवर कमी होत चालली आहे. त्यात तीव्र उन्हाचाही फटका बसतो आहे. त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवनही मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

उजनी धरण उणे २८ टक्के होईपर्यंत डाव्या आणि उजव्या कालव्यातून पाणी सोडता येते, पण धरण उणे १० टक्क्यांवर पोहोचताच पाण्याचा वेग कमी होतो. त्यामुळे आता सध्या सुरू असलेल्या विसर्गाबाबत निर्णय घेण्यात येत आहे.

शेतीसाठी उन्हाळ्यात सलग दोन तास आवर्तने सोडल्याने १७ एप्रिलला धरण उणे झाले. सध्या धरणात जरी ५२ टीएमसी पाणी असले, तरी ते सगळेच पाणी वापरता येत नाही. त्यात गाळ २० टीएमसीपर्यंत आहे.

बाष्पीभवनातूनही जवळपास दीड ते दोन टीएमसी पाणी जाणार आहे. या पार्श्‍वभूमीवर २५ मेपूर्वी सोडलेले पाणी बंद करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे. तसेच त्यानंतर पुढे केवळ पिण्याच्या पाण्यासाठीच हे पाणी राखीव ठेवण्यात येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT