
Solapur News: ऐन उन्हाळ्यात उजनी धरणातून सहा हजार क्युसेकने पाणी नदीपात्रात सोडले जात असल्याने उजनीचा पाणीसाठा उणे ०.०६ टक्क्यांवर आला आहे.
सध्या उजनी धरणातून कालव्यासह नदीत ६.५० टीएमसी पाणी सोडले जात असून, एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात असल्याने उजनीने मात्र तळाकडे वाटचाल सुरू केली आहे. हे पाणी १५ एप्रिलपर्यंत सोडले जाणार आहे. तर १५ एप्रिल ते २५ मे दरम्यान ६.७० टीएमसी पाणी भीमा-सिना जोड कालव्यातून सोडले जाणार आहे.
गतवर्षी पावसाळ्यात उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. पण केवळ नियोजनाच्या अभावामुळे व राजकीय हस्तक्षेपामुळे नेहमीप्रमाणे उजनी लाभक्षेत्राचे वाळवंट होणार आहे. त्यामुळे उभी पिके, फळबागा जगविण्यासाठी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे.
सतत पाणी खाली सोडले जात असल्याने उजनीच्या खाली सुकाळ तर पाणलोट लाभक्षेत्रात दुष्काळ अशी परिस्थिती निर्माण होऊ लागल्याने खरे धरणग्रस्त शेतकरी चिंतेत आहेत. या वर्षी देखील कालवा सल्लागार समितीने उजनी जलाशयाच्या वरच्या शेतकऱ्यांचा विचार केला पण पाणलोट क्षेत्रातील शेतकऱ्यांचा विचार केला नाही, अशी भावना शेतकऱ्यांची आहे.
सुरू असलेला विसर्ग (क्युसेकमध्ये)
नदीद्वारे ६०००
मुख्य कालवा २९५०
कालवा ७७०
वीज निर्मिती १६००
सिनामाढा ३३३
दहिगाव ८०
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.