Urad Harvesting  Agrowon
ॲग्रो विशेष

Urad Threshing : उडीद, मूग मळणीत पावसाने अडथळे

Moong Threshing : खानदेशात उशिराच्या पेरणीच्या उडीद, मूग पिकात मळणीची स्थिती आहे. परंतु सततच्या पावसाने जमीनीत ओलावा असून मळणीत अडचणी येत आहेत.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात उशिराच्या पेरणीच्या उडीद, मूग पिकात मळणीची स्थिती आहे. परंतु सततच्या पावसाने जमीनीत ओलावा असून मळणीत अडचणी येत आहेत. काळ्या कसदार जमिनीत उडीद पिकाची स्थिती बिकट बनली आहे.

खानदेशात उडदाची पेरणी सुमारे १९ हजार हेक्टरवर झाली होती. मूग पिकाची स्थिती अनेक भागात मध्यंतरी अतिपावसाने खराब झाली. उडीद पीक हाती येत असतानाच आणखी पाऊस व ढगाळ वातावरण तयार होत आहे. याचाही फटका पिकास बसत आहे. अनेक शेतकरी उडीद कापणी टाळत आहेत.

कारण लागलीच पाऊस येत आहे. निरभ्र वातावरणाची प्रतीक्षा शेतकरी उडीद मळणीसाठी करीत आहेत. परंतु पावसाळी व ढगाळ वातावरण आहे. मागील दोन दिवसात खानदेशातील अनेक भागांत मध्यम ते जोरदार, हलका पाऊस झाला आहे. यामुळे ओलावा किंवा आर्द्रतेची समस्या कायम आहे.

उडीद पिकात ओलावा असतानाच त्याची मळणी आधुनिक मळणी यंत्रात केली जात आहे. परंतु ही मळणी केल्यानंतर लागलीच वाळवणूक करावी लागते. अन्यथा उडीद पीक लाल, पिवळे पडून खराब होत आहे.

परंतु निरभ्र वातावरण नसल्याने अडचणी आहेत. उडीद मळणीनंत शेतात वाळवणुकीसाठी ठेवता येत नाही. कारण उघड्यावर त्याची पावसाने नासाडी होवू शकते. दुसरीकडे हाती आलेला घास हिरावून जाऊ नये यासाठी शेतकरी मळणीची धावपळ करीत आहेत.

मूग पीक फारसे नाही. परंतु काही शेतकऱ्यांनी उशिरा मूग पेरणी केली होती. या शेतकऱ्यांचे मूग पीक मळणी करून त्याची वाळवणूक सुरू आहे. मागील हंगामात उडीद, मुगाचे कमी पावसाने नुकसान झाले होते. अनेक शेतकरी कमी पावसामुळे मूग, उडीद पेरणी करू शकले नाहीत. जूनमध्ये मागील वेळेस पावसाचा खंड होता. यामुळे अनेक जण वेळेत पेरणी करू शकले नाहीत. यंदा मात्र अतिपावसामुळे अडचणी येत आहेत. कारण मळीच्या काळात पाऊस सुरूच आहे.

उत्पादकता कमी

उडदाची उत्पादकताही कमीच आहे. एकरी अडीच ते तीन क्विंटल उत्पादन उडदाचे येत आहे. त्यात खर्चही मोठा आहे. बियाण्यासाठी एकरी अडीच हजार रुपये खर्च करावा लागला. तसेच खते, फवारणी, कापणी, मळणी याचाही मोठा खर्च आहे. हा खर्च लक्षात घेता उत्पादन व उत्पन्न कमीच आहे, असा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT