Pune News: राज्यात चार दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाने १७ जिल्ह्यांतील सुमारे ७ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सर्वाधिक नुकसान क्षेत्र मराठवाड्यात ४ लाख ४ हजार हेक्टर, त्या पाठोपाठ विदर्भात २ लाख ८० हजार हेक्टर असल्याची माहिती कृषी विभागाच्या स्थानिक सूत्रांनी दिली आहे. पेरण्यांनंतर महिनाभराच्या ओढीनंतर आलेल्या पावसाने काही भागांना दिलासा मिळाला, तर अनेक भागांत पिकांचे नुकसान झाल्याने राज्यातील शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे..राज्य सरकारकडून प्राप्त माहितीनुसार राज्यात गेल्या चार दिवसांत १८७ तालुक्यांमध्ये ६५४ मंडलांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्यातील अंदाजे ५ लाख ४९ हजार ७८५ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे..Heavy Rain Alert: कोकण, घाटमाथ्यावर मुसळधारेचा इशारा.राज्यातील काही भागांत गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या ढगफुटीसदृश पावसाने पिकांचे तर अतोनात नुकसान केलेच, शिवाय जमिनी खरडून गेल्या आणि सुपीक मातीचा थरही वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान वाढले आहे..राज्यात एप्रिल, मेमध्ये काही हजार हेक्टरमधील उन्हाळी पिकांचे नुकसान झाले होते. सध्या खरीप पिके वाढीच्या अवस्थेत असल्यामुळे नुकसानीची व्याप्ती वाढते आहे. राज्याचे मुख्य खरीप पीक असलेले सोयाबीन ५० लाख हेक्टरवर असून, ते शाखीय वाढीच्या स्थितीत आहे. तर ३९ लाख हेक्टरवरील कपाशी आता बोंडे व फुलांच्या अवस्थेत आहे. याशिवाय १५ लाख हेक्टरवर मका; तर १२ लाख हेक्टरवर तूर आहे. १५ लाख हेक्टरवर भात लागवड होत असून विदर्भातील पुनर्लागण अंतिम टप्प्यात आहे. पाऊस यापुढेही चालू राहिल्यास या पिकांचे नुकसानीत वाढ होईलच; परंतु कीड-रोगाची समस्यादेखील वाढू शकते, असे कृषी विभागातून सांगण्यात आले..उपाययोजना आवश्यक : तज्ज्ञसध्या कपाशी पीक पाते लागणे ते बोंड वाढ अवस्थेमध्ये आहे. तूर वाढीच्या आणि सोयाबीन पीक फुलोरा, शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. अतिरिक्त पाण्याचा निचरा करणे आवश्यक आहे. पाणी साचून राहिले तर मूळकुज, मर रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. पुढील टप्यांत ढगाळ वातावरण राहिले तर पिकांवर पाने खाणाऱ्या अळ्या आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यानुसार उपाययोजना कराव्यात, असा सल्ला कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी दिला आहे..Heavy Rain: अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत....या पिकांचे नुकसानखरीप : सोयाबीन, कापूस, मका, मूग, उडीद, हळद, तूरफळबागा : केळी, पपई, संत्रा, मोसंबी, डाळिंब, द्राक्षइतर : ऊस, भाजीपाला, फळभाज्या.पीक नुकसान क्षेत्र* (हेक्टर)खानदेश २५,०००अकोला ५९,२८९वाशीम ९०,०००बुलडाणा ९०२यवतमाळ ८०,०००परभणी ६७,२३०हिंगोली ५६,८०६.छत्रपती संभाजीनगर १२५२.६७नांदेड २,५९,७८९बीड २०४५लातूर २०५९.५५धाराशिव १५,३२६सोलापूर ४१,०००(*स्थानिक सरकारी सूत्रांकडून प्राप्त प्राथमिक माहिती).पावसामुळे सध्या १७-१८ जिल्ह्यांमध्ये पाच ते साडेपाच लाख हेक्टरवर नुकसान झाल्याचा अंदाज आहे. तेथे पीकपंचनामे युद्धपातळीवर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पंचनामे पूर्ण होताच नुकसानीचा अंतिम आकडा कळू शकेल.रफिक नाईकवाडी, कृषी संचालक, विस्तार व प्रशिक्षण, पुणे.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.