Pune News: राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून ठिबक अनुदानासाठी अर्ज भरताना गेल्या महिनाभरापासून शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. महाडीबीटी संकेतस्थळावरून व्यवस्थित सेवा मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्याची दखल घेऊन फलोत्पादन संचालक अंकुश माने यांनी संगणक विभागाला पत्र पाठवून सुधारणा करण्याच्या सूचना दिल्याचे समजते. .कृषी योजनांसाठीची लॉटरी (सोडत) पद्धत रद्द करत ‘प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य’ ही पद्धत घाईघाईने लागू करण्यात आली. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या पद्धतीनुसार आठ ऑगस्ट रोजी राज्यातून १.२३ लाख शेतकऱ्यांची निवड करण्यात आली..MahaDBT Portal Issue: अकार्यक्षम ‘महाडीबीटी’ पोर्टलमुळे शेतकरी त्रस्त.निवड झालेल्या शेतकऱ्यांना अॅग्रीस्टॅक क्रमांक नमूद केल्यानंतर ओटीपी पाठवला जात नाही, असे फलोत्पादन संचालकांनी पत्रात नमूद केले आहे. शेतकऱ्यांना ओटीपी मिळण्याऐवजी ‘आपण दिलेल्या शेतकरी आयडीची माहिती मिळण्यास वेळ लागतो आहे..MahaDBT Portal : ‘महाडीबीटी’ डाउन, लाभार्थी वंचित.त्यामुळे काही वेळानंतर प्रयत्न करा,’ असे संदेश मिळत आहे. विशेष म्हणजे ‘पूर्वसंमती मिळाल्यानंतर कागदपत्रे अपलोड न करता आल्यामुळे सदर अर्ज रद्द झाले आहेत,’ असेही संचालकांनी निदर्शनास आणून दिले आहे..‘महाडीबीटी’मध्ये कागदपत्रे अपलोड करण्यात शेतकऱ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचण दूर करा, संकेतस्थळ सुरळीत होईपर्यंत शेतकऱ्यांचे अर्ज रद्द करू नका; तसेच संगणकीय प्रणालीने आपोआप रद्द (ऑटो कॅन्सल) केलेले अर्ज तत्काळ पूर्वत (रिव्होक) करा, अशा सूचना संचालकांनी या पत्रात केल्या आहेत, असे सूत्रांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.