Food Corridors Agrowon
ॲग्रो विशेष

Food Processing Industry : ‘फूड कॉरिडॉर’करिता यूएई करणार २ अब्जाची गुंतवणूक

Investing in Food Corridors : भारत आणि संयुक्त अरब अमिरात (यूएई) यांच्या दरम्यान २ अब्ज (सुमारे १६ हजार ७९३ कोटी रुपये) डॉलर्सच्या ‘फूड कॉरिडोअर’च्या संधी भारतीय अन्न प्रक्रिया उद्योगांकरिता उपलब्ध होणार आहेत.

Team Agrowon

New Delhi News : भारत आणि संयुक्त अरब अमिरात (यूएई) यांच्या दरम्यान २ अब्ज (सुमारे १६ हजार ७९३ कोटी रुपये) डॉलर्सच्या ‘फूड कॉरिडोअर’च्या संधी भारतीय अन्न प्रक्रिया उद्योगांकरिता उपलब्ध होणार आहेत. याअंतर्गत फूड पार्क, प्रक्रिया उद्योगात नोकऱ्यांची संधी उपलब्ध होणार आहेत.

केंद्रीय वाणिज्य मंत्रालय आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यात नुकत्याच झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल आणि अबुधाबी इनव्हेसमेंट आथॉरिटीचे व्यवस्थापकीय संचालक शेख हमीद बीन झाएद अल नाहयान हे प्रमुख उपस्थित होते. अन्न सुरक्षा पुरविण्याकरिता यूएई फूड कॉरिडॉरमध्ये गुंतवणूक करणार आहे. भारतातून २०२३-२४ या वर्षात २६,१३८.९५ कोटी रुपयांची कृषी निर्यात यूएईला केली गेली.

सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारांतर्गत भारत- यूएई दरम्यानच्या द्वीपक्षीय व्यापारात वाढ झाली आहे. दरवर्षी यात ९.८ टक्के वृद्धी होत आहे. खनिज तेलाव्यतिरिक्त २०२४च्या पहिल्या चारमहित २८.२ अब्ज डॉलर्सची व्यापार झाला आहे. परकीय थेट गुंतवणूकदार म्हणून यूएईने २.०५ अब्ज डॉलर्सची भारतात गुंतवणूक केल्याने तो भारतात सर्वाधिक गुंतवणूक करणारा चौथा देश ठरला आहे. भारतात आगामी काळात ऊर्जा, आर्टिफिशियल इंटिलेजन्स, लॉजिस्टिक, अन्न आणि कृषी क्षेत्रात सुमारे १०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक यूएई करणार आहे.

फूड कॉरिडॉरमधील गुंतवणूक

- अन्न प्रक्रिया उद्योग

- फूड पार्क लॉजिस्टिक

केंद्र सरकारनुसार होणारा फायदा

- शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ

- अन्न प्रक्रिया उद्योगात नोकऱ्यांची संधी

- ‘यूएई’साठी अन्न सुरक्षा वाढणार

‘मिशन मोड’वर उभय देशांदरम्यान ‘फूड कॉरिडॉर’ची ही स्थापना पुढे नेण्यासाठी आम्ही केंद्रासह राज्य सरकारांचा आणि यूएईचा एक छोटा कार्यगट स्थापन केला आहे. या गुंतवणुकीचा फायदा देशातील प्रक्रिया उद्योग, शेतकऱ्यांना होणार आहे.’
पीयूष गोयल, केंद्रीय मंत्री, वाणिज्य मंत्रालय

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune Fruit Market: उन्हाळी हंगामात फळे तेजीत

Education Reform: शिक्षणात सुधारणा ही सामूहिक जबाबदारी

Ethanol Fuel: इथेनॉल ठरेल पर्यायी इंधन

Namo Shetkari Mahasamman Yojana: ‘नमो’चा आठवा हप्ता पुढील आठवड्यात

Pune ZP: पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी वीरधवल जगदाळे

SCROLL FOR NEXT