Nitin Gadkari : विदर्भात मोठी गुंतवणूक आणण्यासाठी प्रयत्नांना अपेक्षित यश मिळत नाही, गडकरी यांची खंत

Nitin Gadkari on Ladki Bahin Yojna : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विदर्भातील कमी होणाऱ्या गुंतवणुकीवरून खंत व्यक्त केली आहे. तसेच उद्योजकांनी सरकारच्या अनुदानाच्या पैशांवर अवलंबून राहू नका असा सल्ला दिला आहे.
Nitin Gadkari on Ladki Bahin Yojna
Nitin Gadkari on Ladki Bahin YojnaAgrowon
Published on
Updated on

Pune News : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यात जोमात सुरू असलेल्या लाडकी बहीण योजनेवरून उद्योजकांना सल्ला दिला आहे. गडकरी यांनी, सध्या राज्य सरकार या योजनेवर प्रचंड खर्च करत आहे. यामुळे अनुदानाच्या पैशांची सध्या शाश्वती नसल्याचे म्हटले आहे. तसेच आपण अनेक वर्षांपासून विदर्भात मोठी गुंतवूण आणण्यासाठी प्रयत्न करत असून यात अपेक्षित यश मिळत नसल्याने खंत व्यक्त केली आहे. यामुळे आता राज्यातील विरोधकांना आयत कोलीत मिळालं आहे. ते नागपूर येथील 'ॲडव्हान्टेज विदर्भ' या उद्योजकांसाठी आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

गडकरी यांनी या कार्यक्रमात विदर्भातील उद्योजक आणि गुंतवणूकदारांना एक सल्ला दिला. ज्याची आता चर्चा होत आहे. गडकरी यांनी, शासनाच्या भरवशावर उद्योजकांनो राहू नका. शासन ही विषकन्या असते. कोणताही पक्ष असो, त्यांचे नुकसान होते, असे गडकरी यांनी म्हटले आहे. तसेच सध्या शासन लाडकी बहीण योजनेवर मोठा खर्च करत आहे. यामुळे तुम्हाला अनुदान मिळेल याची शाश्वती नाही, असेही गडकरी यांनी म्हटले आहे.

Nitin Gadkari on Ladki Bahin Yojna
Union Minister Nitin Gadkari : आरएसएसनंतर आता गडकरी यांची शेतकरी आंदोलनावर टीका; म्हणाले, 'आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित'

यावेळी गडकरी यांनी विदर्भातील गुंतवणूकीवर प्रकाश टाकताना, विदर्भात ५०० हजार कोटींची गुंतवणूक करण्यास कोणीही तयार नाही. येथे मिहानसारखा प्रकल्प आहे. यात गुंतवणूक करण्यासाठी उद्योजकांनी जमिनी खरेदी केल्या. मात्र युनिटच सुरू केलेले नाहीत. यामुळे विदर्भाचा विकास रखडला आहे. विकासात अडथळे येत आहेत.

Nitin Gadkari on Ladki Bahin Yojna
Majhi Ladki Bahin Yojna : ‘‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’चे त्रुटी असलेले अर्ज फेरसादर करा’

तर नव्या उद्योजकांनो आपल्या उद्योगाच्या उभारणीसाठी शासनाच्या अनुदान किंवा मदतीवर अवलंबून राहू नका. स्वत:च्या हिंमतीवर आणि भांडवलावर उद्योग उभारा, असा सल्ला दिला आहे. तर शासनाचे नियम आणि सिस्टीम उद्योगांच्या अडचणी निर्माण करणारी असते. यामुळे उद्योग शाश्वत असावा, इकडे तुम्ही लक्ष द्या, असा सल्ला गडकरी यांनी उद्योजकांना दिला आहे.

तसेच कोणत्याही पक्षाचे सरकार असो, गुंतवणूकदारांनी सरकारला वेगळं ठेवलं पाहिजे. सरकार विषकन्या असून सरकारच्या भरोशावर राहू नका. तुम्हाला अनुदान घ्यायचं आहे घ्या. मात्र, अनुदानाता काहीही भरोसा नाही. कारण सरकार लाडकी बहीण योजनेवर मोठा निधी खर्च करत आहे. यामुळे इतर योजना किंवा अनुदान योजनांवर मिळणाऱ्या निधीत घट झाल्याचा घरचा आहेर गडकरी यांनी दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com