Odisha Railway Accident Agrowon
ॲग्रो विशेष

Odisha Railway Accident : ओडिशात समोरासमोर दोन रेल्वेची धडक; मृतांचा आकडा २०० पेक्षा अधिक तर ९०० जण जखमी

सध्या आमचं लक्ष केवळ बचावकार्याकडे आहे. रेल्वे, एनडीआरएफ आणि एसडीआरएफची बचाव कार्य सुरू आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

Team Agrowon

ओडिशातील बालासोर येथे शुक्रवारी (ता.२) संध्याकाळी भीषण रेल्वे अपघात झाला. या अपघातात २३३ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर ९०० प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

अपघात स्थळी ओडीशातील स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफचे बचाव पथक पोहचले असून बचावकार्य सुरू आहे, अशी माहिती ओडीशाचे सचिव प्रदीप जेना यांनी माध्यमांना दिली आहे.

सध्या आमचं लक्ष केवळ बचावकार्याकडे आहे. रेल्वे, एनडीआरएफ आणि एसडीआरएफची बचाव कार्य सुरू आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. विरोधी पक्षाने रेल्वे मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

हावडा-चेन्नई कोरोमंडळ एक्सप्रेसचे काही डब्बे रुळावरून घसरले. मात्र त्यानंतर काही क्षणातच समोरून मालगाडी आली येऊन एक्सप्रेसला धडकली. त्यामुळे भीषण अपघात झाला. सिंगलवरील गडबडीमुळे हा अपघात घडल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

बहनागा रेल्वे स्थानिकाजवळ कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडीची समोरासमोर धडक झाली. ओडीशाचे मुख्य सचिव यांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात तीन रेल्वेंचा समावेश आहे.

एनडीआरएफच्या चार तुकड्यासोबत ३० डॉक्टर, २०० पोलिस आणि ६० रुग्णवाहिका घटनास्थळी बचावकार्य करत आहेत.

ओडीशा सरकारचे मंत्री अपघात स्थळी शुक्रवारी उशिरा दाखल झाले आहे. तसेच ओडीशा सरकारने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत जाहीर केलइ आहे. तर गंभीर जखमींना २ लाखांची मदत केली जाणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT