Jayant Patil Sugar Factory agrowon
ॲग्रो विशेष

Jayant Patil Sugar Factory : ‘राजारामबापू’ कारखान्यांकडून पहिली उचल ३ हजार २०० जाहीर

Rajarambapu factories राजारामबापू सहकारी साखर कारखान्याची एकरकमी एफआरपी ३ हजार २७५ रूपये बसते परंतु एफआरपी दोन टप्प्यात घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे.

sandeep Shirguppe

Sangli Suarcane Farmers : राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या साखराळे, वाटेगाव व कारंदवाडी युनिटच्या २०२४-२५ मध्ये उसाची पहिली उचल ३ हजार २०० रूपये जाहीर करण्यात आली आहे. पहिली उचल प्रतिटन ३ हजार २००देणार असल्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी शुक्रवार (ता.०६) येथे केली. राजारामबापू सहकारी साखर कारखान्याची एकरकमी एफआरपी ३ हजार ३४० रूपये बसते परंतु एफआरपी दोन टप्प्यात घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

याबाबत कारखान्याचे अध्यक्ष पाटील म्हणाले की, २०२४-२५ मधील अंतिम दर अंदाजे ३ हजार २७५ रुपये अपेक्षित आहे. परंतु यातील उर्वरित रक्कम दिपावलीस देणार असल्याची माहिती देण्यात आली. याचबरोबर जत-तिप्पेहळ्ळी युनिटकडील ऊसदराचा निर्णय लवकरच घेतला जाईल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

कारखाना व्यवस्थापनाने २०२४-२५ हंगामात साखराळे युनिटकडे ९ लाख ५० हजार टन, वाटेगाव - सुरुल युनिटकडे ५ लाख टन, कारंदवाडी युनिटकडे ४ लाख ५० हजार टन तसेच जत-तिप्पेहळ्ळी युनिटकडे ३ लाख असे एकूण २२ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. सर्व ऊस उत्पादक व सभासदांनी पिकविलेला सर्व ऊस गळितास पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी केले आहे.

शेतकऱ्यांची नाराजी

सांगली जिल्ह्यात साखर कारखान्यांचा गळीत हंगाम जोरदार सुरू झाला आहे. सर्व कारखान्यांनी दैनंदिन उसाचे गाळप व साखरेची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. परंतु सांगली जिल्ह्यातील कारखाने ऊसदराबाबत अद्यापही आपली भूमिका जाहीर करण्यास तयार नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये असमाधानाचे वातावरण असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुक्याध्यक्ष भागवत जाधव म्हणाले.

दरम्यान शेतकऱ्यांकडून जास्त पसंतीस असलेल्या ८६०३२ या व्हरायटीवर सध्या तांबेरा सदृश रोग दिसत आहे. यामुळे उसाचे शेंडे वाळू लागले आहेत. सध्या सुरू लागण व अडसाली उसाची तोड सुरू आहे. खोडवा, नेडवा ऊस पीक तोडणीस विलंब होत असतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वजनात तूट वाढत जाते. मोठ्या प्रमाणावर झालेल्या पावसाने एकीकडे उसाचे सरासरी उत्पन्न घटले आहे तर दुसरीकडे दराची समाधानकारक खात्री वाटत नसल्याने शेतकरी वर्गात अस्वस्थता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT