Marathwada Rain : मराठवाड्यात तीन जिल्ह्यांत पाऊस; विविध पिकांवर संकटाचे ढग

Rain Update : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांतील बहुतांश भागात गुरुवारी (ता. ५) रात्री व शुक्रवारी (ता. ६) पहाटे व सकाळी कुठे, तर कुठे मध्यम पावसाची हजेरी लागली.
Rain Issue
Rain IssueAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांतील बहुतांश भागात गुरुवारी (ता. ५) रात्री व शुक्रवारी (ता. ६) पहाटे व सकाळी कुठे, तर कुठे मध्यम पावसाची हजेरी लागली. ढगाळ वातावरणामुळे कीड- रोगांचे संकट निर्माण झाले आहे. त्याबरोबरच वेचणीला आलेला कापूस पावसामुळे भिजत आहे.

अवेळी आलेल्या या पावसामुळे वेचणी सुरू असलेला कापूस भिजत असून, फुलोऱ्यातील तुरीची फुलगळ होत असून, द्राक्षामध्येही घडकुज होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तवण्यात येत आहे. मोसंबी बागा आताच्या घडीला ताणावर आहेत. डिसेंबर अखेरपर्यंत त्यांचा ताण देण्याचे मोसंबी बागायतदारांचे नियोजन असते.

Rain Issue
Maharashtra Weather Forecast : रविवारपर्यंत ढगाळ हवामान राहणार; आजपासून ३ दिवस काही ठिकाणी पावसाची काहिशी शक्यता

ज्या भागातील बागांमध्ये पाऊस मध्यम वा बरा झाला त्या बागांचा ताण वेळेपूर्वीच विस्कळीत करण्याचे काम अवेळी आलेल्या या पावसाने केले आहे. जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्‍यातील टेभुर्णी, वरूड बु. परिसरांत पावसाची हजेरी लागली. रोहिलागड परिसरात शुक्रवारी सकाळी ८ ते ९ दरम्यान दमदार पावसाची हजेरी लागली.

जालना शहर परिसरात मध्यम पाऊस झाला. अंबड शहरासह परिसरात रिमझिम पावसाने हजेरी लावली. गोंदी परिसरात सकाळी साडेनऊच्या सुमारास हलका पाऊस झाला. घनसावंगीत पावसाच्या हलक्‍या सरी झाल्या. जवखेड ठोंबरी परिसरात सकाळी दोन तास रिमझिम पाऊस झाला. सुखापुरी, आष्टी, वडीगोद्री परिसरांतही रिमझिम पाऊस झाला. कडवंचीसह द्राक्ष बागांच्या पट्ट्यातील गावशिवारातही पावसाची हजेरी लागली.

Rain Issue
Maharashtra Rain : पावसाची हजेरी, तापमानात वाढ

या परिसरात दोन-तीन दिवसांपासून दररोज सकाळी पाऊस होत आहे. बीड शहरात सकाळी रिमझिम पाऊस झाला. शिरूर कासार तालुक्‍यात अनेक भागांत शुक्रवारी पहाटेपासूनच पावसाने हजेरी लावली. टाकरवण परिसरात साडेदहाच्या सुमारास रिमझिम पावसाला सुरुवात झाली होती. किल्लेधारूर, अंबाजोगाई, माजलगाव, गेवराई तालुक्‍यांत ढगाळ वातावरण होते.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्‍यातील चापानेर परिसरात शुक्रवारी सकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे काढणीला आलेल्या शेतीमालासह कांद्याच्या रोपांवर संकट ओढावले होते. गंगापूर शहरातही पावसाची हजेरी लागली. सिल्लोड तालुक्‍यातील शिवना पसिरात शुक्रवारी सकाळी पावणेसातच्या सुमारास सुमारे अर्धा तास मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.

चित्तेपिंपळगाव परिसरात सकाळी रिमझिम पाऊस झाला. लिंबेजळगाव परिसरात शुक्रवारी पहाटे अडीचपासून पावसाची भुरभुर सुरू होती. गंगापूर तालुक्‍यातील कायगाव परिसरात झालेल्या पावसाने ऊसतोड मजुरांवर संकट आणले. त्यांच्या कोप्या,अन्नधान्य भिजले. बीडकिन व चितेगाव परिसरात पहाटे तीनपासून पावसाला सुरुवात झाली होती.

माणिकनगर, ढोरकीन, पाचोड, देवगाव रंगारी, करमाड, बालानगर, आडूळ, गल्लेबोरगाव, लाडसावंगी, लोहगाव परिसरात रिमझिम पाऊस झाला. जिल्ह्यातील महालगाव, जायकवाडी, आळंद, टाकळी राजेराय आदी परिसरात रिमझिम पाऊस झाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com