Electricity Agrowon
ॲग्रो विशेष

Electricity Connection : पुणे परिमंडलात दोन लाख ३३ हजार वीजजोड

Electricity : ‘वन इज ऑफ लिव्हिंग’नुसार ग्राहक सेवा देताना महावितरणच्या पुणे परिमंडलात गेल्या वर्षभरात विक्रमी २ लाख ३३ हजार ६०९ नवीन वीजजोडण्या दिल्या आहेत.

Team Agrowon

Pune News : ‘वन इज ऑफ लिव्हिंग’नुसार ग्राहक सेवा देताना महावितरणच्या पुणे परिमंडलात गेल्या वर्षभरात विक्रमी २ लाख ३३ हजार ६०९ नवीन वीजजोडण्या दिल्या आहेत. नवीन वीजजोडणी देण्याचा दरमहा सरासरी वेग आता १९ हजार ९०० वर गेला आहे, अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली.

राज्य शासनाने ‘वन इज ऑफ लिव्हिंग’नुसार ग्राहकसेवा गतिमान करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार पुणे परिमंडलांतर्गत नवीन वीजजोडण्या व आवश्यकतेनुसार वीजमीटरचा पुरवठा व्हावा यासाठी दर आठवड्यात मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांच्याकडून आढावा घेण्यात येत आहे.

त्यामुळे नवीन वीजजोडणी देण्याची प्रक्रिया आणखी गतिमान झाली आहे. पुणे परिमंडलामध्ये नवीन वीजजोडण्यांना मोठा वेग दिल्याने डिसेंबर २०२२ ते नोव्हेंबर २०२३ पर्यंत वर्षभरात तब्बल २ लाख ३३ हजार ६०९ नवीन वीजजोडण्या कार्यान्वित झाल्या आहेत.

तर, चालू आर्थिक वर्षांत एप्रिल ते नोव्हेंबरपर्यंतच्या आठ महिन्यांमध्ये सर्व वर्गवारीच्या तब्बल १ लाख ५९ हजार २०९ नवीन वीजजोडण्या कार्यान्वित झाल्या आहेत. पुणे परिमंडलात नवीन वीजजोडण्यांचा वेग आणखी वाढविण्यात आला आहे.

त्यासाठी परिमंडलस्तरावर दर सोमवारी व गुरुवारी विभाग कार्यालयनिहाय आढावा घेण्यात येत आहे. त्याची फलनिष्पत्ती म्हणजे नवीन वीजजोडण्या देण्याचा दरमहा वेग एक वर्षापूर्वी १५ हजार ते १६ हजार होता. तो आता दरमहा १९ हजार ९०० वर गेला आहे, अशी माहिती मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Payment: उसाचा १०० रुपये दुसरा हप्ता तातडीने जमा करा अन्यथा आंदोलन, 'स्वाभिमानी'चा कारखान्यांना इशारा

Parbhani Dam Water Update: परभणी जिल्ह्यातील लघु प्रकल्पांत ११, मध्यम प्रकल्पांत ९ टक्के पाणीसाठा

Turmeric Farmers Support: हळदीला विमा संरक्षणाने शेतकऱ्यांना दिलासा

Fertilizer Dealers Complaint: खत विक्रीत लिंकिंगचा आरोप

Women Farmers: ‘वसंधुरा’च्या महिलांकडून सायकल कोळप्याने कोळपणी

SCROLL FOR NEXT