Sugarcane Crushing  Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Crushing : सहा जिल्ह्यांतील एकवीस कारखान्यांचा गाळपासाठी प्रस्ताव

Sugarcane Crushing Season : १ लाख ४२ हजार ९०१ हेक्टरवरील ऊस गाळपासाठी उपलब्ध

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील तीन व खानदेशातील तीन मिळून सहा जिल्ह्यांतील २१ साखर कारखान्यांनी ऊस गाळप करण्यासाठी प्रस्ताव दाखल केले आहेत. यासंदर्भात छत्रपती संभाजीनगर येथील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाच्या वतीने नुकताच आढाव घेण्यात आला.

यंदाच्या ऊस गाळप हंगामासाठी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड व खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव या सहा जिल्ह्यांतील २१ कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी प्रस्ताव दिले आहेत. त्याची प्रक्रिया सुरू आहे. यंदाच्या ऊस गाळपासाठी सहाही जिल्ह्यांत सुमारे १ लाख ४२ हजार ९०१ हेक्टरवरील ऊस उपलब्ध आहे.

त्यामध्ये आडसाली ५९२३ हेक्टर, पूर्वहंगामी २९ हजार ५४० हेक्टर, सुरू ३५ हजार ५९६ हेक्टर तर खोडवा ७१ हजार ८३३ हेक्टर ऊस क्षेत्राचा समावेश आहे. अंदाजानुसार यंदाच्या ऊस गाळपासाठी गतवर्षीच्या तुलनेत कमी ऊस उपलब्ध असला, तरी उपलब्ध उसाच्या आधारे चार किंवा पाच महिन्यांपर्यंत ऊस गाळात हंगाम चालण्याची आशा आहे. प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाच्या वतीने प्रस्ताव सादर करणाऱ्या २१ कारखान्यांच्या प्रतिनिधींची नुकतीच बैठक घेण्यात आली.

त्याला या बैठकीत गाळप परवान्यासाठी केलेल्या प्रस्तावातील त्रुटी, उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने ऊसतोड कामगारांसाठी तसेच इतर आवश्यक सुविधा विषयी दिलेल्या आदेशाचे पालन करण्यासंदर्भात सूचना कारखान्यांना देण्यात आल्या. सोलार पॉवर जनरेशनचा आढावा या वेळी घेण्यात आला. त्यामध्ये केवळ एका कारखान्याची प्रक्रिया सुरू असल्याचे निदर्शनास आले. एक, दोन कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात त्यांच्या गाळप क्षमतेच्या तुलनेत अधिकचा ऊस उपलब्ध होण्याची शक्यता लक्षात घेता त्या उसाचे नियोजन करण्यासंदर्भातही चर्चा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. मंत्री समिती निर्णयानुसार १५ नोव्हेंबरपासून गाळप हंगाम सुरू होणे अपेक्षित आहे.


जिल्हानिहाय गाळप परवाना स्थिती...

त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आठ, जालन्यातील चार, बीडमधील सात तर जळगाव व नंदुरबारमधील प्रत्येकी एका कारखान्यांनी यंदाच्या ऊस गाळपासाठी परवानगी मागितली आहे. याशिवाय नंदुरबार जिल्ह्यातील दोन खांडसरी प्रकल्पाचाही यामध्ये समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement Center : कोरेगावात सोयाबीन खरेदी केंद्र सुरू

Sugarcane Farming : शाहूवाडी परिसरात खुंटली आडसाली उसाची वाढ

Dairy Farming : दुग्ध व्यवसाय प्रत्येक शेतकऱ्याचा मोठा आधार

Water Crisis : ‘मोरणे’चे पात्र पडू लागले कोरडे

Achalpur APMC : अचलपूर बाजार समिती देणार व्यापाऱ्यांना ओळखपत्र

SCROLL FOR NEXT