Crop Damage  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : पावसामुळे सोयाबीनसह तुरीचे पीक पाण्यात

Heavy Rain Crop Loss : पावसाचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त झाल्याने तुरीचे पीकही वाया गेल्यात जमा झाले आहे.

Team Agrowon

Dharashiv News : परिसरातील धानोरा दगड, मळगी, मळगीवाडी, गुरूवाडी, आष्टा (ज.), कोळसुर, हिप्परगाराव, चिंचकोट, तलमोड, कराळी आदी ठिकाणी पावसामुळे सोयाबीन, तुरीचे पीक वाया गेल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

यंदा पावसाने सुरवातीला जोरदार सुरवात केल्याने खरिपाच्या पेरण्या वेळेवर झाल्या होत्या, त्यानंतर शेतकऱ्यांनी वेळेवर अंतर मशागतीची कामे केल्याने पिके एकदम जोमदार आली होती.

यंदा उत्पादन व उत्पन्न वाढणार अशी अपेक्षा असताना ऐन काढणीच्या काळात पावसाने सतत व्यत्यय आणल्यामुळे सोयाबीन रानातच कुजून जात आहे. पावसाचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त झाल्याने तुरीचे पीकही वाया गेल्यात जमा झाले आहे.

खरिपातील बहुतांश पिके वाया गेली असून आता रब्बी हंगामातील पिके सतत पडणाऱ्या पावसामुळे पेरणी करता येत नाहीत.

त्यामुळे खरीप हातचे गेले असून आता रब्बीचा हंगाम पण वाया जाईल का? अशी शंका शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे. एकीकडे निसर्ग कोपला असताना मजूर वेळेवर मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT