Paddy Crop Damage : पुणे जिल्ह्यात वादळी पावसाचा तडाखा; भात पिकांचे मोठे नुकसान

Crop Loss Issue : पुणे जिल्ह्यातील सिंहगड आणि पश्चिम हवेली भागात यंदा चांगल्या पावसामुळे भाताचे पीक कापणीस आले होते. परंतु, अचानक आलेल्या वादळी पावसामुळे या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon
Published on
Updated on

Pune News : यंदा पुणे जिल्ह्यातील सिंहगड आणि पश्चिम हवेली भागात चांगल्या पावसामुळे भाताचे पीक जोमात आले होते. परंतु, अचानक आलेल्या वादळी पावसामुळे या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकत्याच झालेल्या जोरदार वाऱ्यांसह पावसाने शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले आहे.

राजगड तालुक्यातील पानशेत, कादवे, निगडे मोसे, आंबेड, पाबे, विझंर आणि हवेली तालुक्यातील सोनापूर, आंबी, खामगाव मावळ, कल्याण, आर्वी, मांडवी या गावांत गुरुवारी जोरदार वादळी पाऊस झाला. या वादळी पावसामुळे भात पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे, ज्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत.

Crop Damage
Paddy Crop : दमदार पावसामुळे भात पिके निसवण्याच्या अवस्थेत

ऐन कापणीच्या हंगामात पावसाने हजेरी लावल्याने फक्त भाताचेच नाही, तर इतर पिकांवरही परिणाम झाला आहे. पावसामुळे कापलेले भात भिजून गेले आहे; तर न कापलेले भातसुद्धा आडवे पडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मेहनत वाया जात आहे. तसेच भात पिकांच्या संपूर्ण हंगामावर पावसाचा परिणाम होत असल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहेत.

Crop Damage
Paddy Crop Damage : बहरलेल्‍या भातपिकाचे पावसामुळे नुकसान

पीक कापणीस आले असताना दररोज पाऊस पडत आहे. सततच्या पावसामुळे भात पिकाचे नुकसान होत आहे. अनेक ठिकाणी पिकांना मार बसल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

कृषी विभागाचे आश्वासन

वादळी पावसामुळे या भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे शोषण होऊ नये यासाठी स्थानिक प्रशासनाने तातडीने कडक पावले उचलली आहेत. शेतकऱ्यांची नुकसान भरपाई प्रक्रिया लवकरच सुरू होईल. पंचनामे पूर्ण होताच संपूर्ण माहिती संकलित करून ती संबंधित विभागांना तात्काळ पाठवली जाईल अशी माहिती कृषी विभागाने दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com