Tur Harvesting Agrowon
ॲग्रो विशेष

Tur Harvesting : करमाळ्यात तुरीच्या मळणीला वेग; शेतकऱ्यांचा उत्साह !

Harvesting Season : करमाळा तालुक्यातील उत्तर भागात तूर मळणीला वेग आला आहे. काही ठिकाणी पारंपरिक पद्धतीने तुरीची खुडणी करून मळणी केली जात आहे तर अनेक शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने हार्वेस्टर लावून तुरीची मळणी केली आहे.

Team Agrowon

Solapur News : करमाळा तालुक्यातील उत्तर भागात तूर मळणीला वेग आला आहे. काही ठिकाणी पारंपरिक पद्धतीने तुरीची खुडणी करून मळणी केली जात आहे तर अनेक शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने हार्वेस्टर लावून तुरीची मळणी केली आहे.

गतवर्षी दुष्काळी स्थितीमुळे करमाळा तालुक्यातील उत्तर भागात यावर्षी तुरीचा पेरा ज्यास्त झाला आहे. सध्या माळरानावरील तुरीची मळणी झाली असून, सर्वरातील तुरीची काढणी सुरू आहे. यावर्षी परराज्यातील हार्वेस्टर तूर मळणीसाठी दाखल झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी हार्वेस्टरने मिळणे केली आहे. तर काही शेतकऱ्यांनी मजूर लावून तुरीची खुडणी केली आहे. यानंतर आधुनिक यंत्राने तुरीची मळणी केली आहे.

यावर्षी मुबलक प्रमाणात पाऊस झाल्याने व मृग नक्षत्रात पेरणी झाल्याने तुरीला उतारा चांगला मिळत आहे. जिरायत भागावर एक एकरात चार क्विंटलपासून सहा क्विंटलपर्यंत उतारा मिळत असून बागायतात तुरीला दहा क्विंटल ते बारा क्विंटलपर्यंत एकरी उतारा मिळाला आहे. या तुरीला सध्या बाजारात ६८०० ते ७७०० रुपये क्विंटलने दर मिळत आहे.

नोव्हेंबर महिन्यात तुरीचा बाजार भाव ११ हजार ते १० हजारांपर्यंत होता. मात्र तुरीची आवक होताच बाजार भाव कमी झाल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे

यावर्षी वेळेवर पेरणी झाल्याने तुरीचे उत्पन्न वाढले आहे. बागायत क्षेत्रात दहा क्विंटलपर्यंत उतारा मिळाला आहे. त्यामुळे कमी खर्चात यावर्षी तुरीने जास्त उत्पन्न दिले आहे.
रामभाऊ नलवडे, शेतकरी, बाळेवाडी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Damage Compensation : खरडून गेलेल्या जमिनीचे अचूक पंचनामे करा

Sugarcane Rate : मांजरा साखर कारखाना देणार उसाला उच्चांकी दर

Landslide : पावसाचा जोर वाढला; करूळ घाटात दरड कोसळली

Solapur Flood : पूरबाधित ४० गावांतील नुकसानग्रस्त घरांच्या तातडीने याद्या तयार करा

Pomegranate Crop Damage : सांगली जिल्ह्यात डाळिंबाचे नुकसान

SCROLL FOR NEXT