Battery Powered Harvester : बॅटरीवर चालणारे पालेभाजी कापणी यंत्र

Agriculture Technology : भारतीय कृषी संशोधन संस्थेतील तज्ज्ञांनी पालक, मेथी आणि कोथिंबीर कापणीसाठी यंत्राची निर्मिती केली आहे. सध्या प्रक्षेत्रावर यंत्राची कार्यक्षमता आणि पिकाच्या संरचनेचा सविस्तर अभ्यास करण्यात येत आहे.
Vegetable Harvesting
Vegetable HarvestingAgrowon
Published on
Updated on

डॉ. सुजीत यमगर

Technology in Agriculture : पालेभाज्या या आहाराचा महत्त्वाचा घटक आहे. यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे व तंतुमय पदार्थांचा उत्तम स्रोत आहे. पारंपरिक आयुर्वेदिक औषधांमध्ये पालेभाज्यांचे महत्त्व अधोरेखित केले गेले आहे. या भाज्या स्वस्त, सहज उपलब्ध आणि विविध पाककृतींसाठी उपयुक्त असल्यामुळे भारतीय खाद्यसंस्कृती आणि परंपरेत त्यांचे विशेष महत्त्व आहे. पालेभाज्यांचे कापणी प्रामुख्याने हाताने केली जाते, जी वेळखाऊ आणि कष्टप्रद आहे. त्यामुळे कापणी प्रक्रियेचे यांत्रिकीकरण होणे आवश्यक आहे. यामुळे वेळ, खर्च व कामगारांचा त्रास कमी होईल तसेच उत्पादकता व नफा वाढेल.

कापणी यंत्राची कार्य पद्धत

संशोधन प्रकल्पामध्ये पालक, मेथी आणि कोथिंबीर या पालेभाज्यांचा अभ्यास करण्यात आला. त्यांची भौतिक वैशिष्ट्ये, अभियांत्रिकीदृष्ट्या पैलू आणि पिकाच्या रचनेचा सविस्तर अभ्यास करण्यात आला. पालेभाज्या कापणी यंत्राच्या निर्मितीसाठी आवश्यक तांत्रिक बाबी जसे की शक्तीची गरज आणि कापणी यंत्रणा यांचे मापन करण्यात आले आहे.

कापणीसाठी आवश्यक शक्ती मोजण्यासाठी एक इंच कोन लोह, डबल-अ‍ॅक्टिंग कटर बार, डिजिटल एलसीडी डिस्प्ले, एस (S)प्रकार लोड सेल आणि पीक धरून ठेवण्याचे युनिट यांचा समावेश असलेली यंत्रणा तयार करण्यात आली.

Vegetable Harvesting
Agriculture Technology : बूस्टर जनुकामुळे प्रकाश संश्‍लेषणात लक्षणीय वाढ

पालकाच्या १२ पानांवर ०.२५ मी/सेकंद वेगाने सर्वाधिक कापणी शक्ती १५.६८ न्यूटन आणि १३५४.७ न्यूटन-मिलिमीटर ऊर्जा मोजली गेली. सर्वांत कमी कापणी शक्ती ०.५३ मी/सेकंद वेगाने ४.९३ न्यूटन व १४१.९ न्यूटन-मिलिमीटर ऊर्जा मोजली गेली.

कापणी वेग वाढल्यास शक्ती व ऊर्जा कमी लागते. कटर ब्लेड प्रकाराचा परिणाम महत्त्वाचा नाही. सर्व पालेभाज्यांच्या कापणीसाठी आवश्यक शक्तीचा विचार करून, सर्वाधिक शक्ती लागणाऱ्या दोन पालेभाज्यांसाठी प्रयोग करण्यात आले.

यंत्राचे मुख्य भाग

रील : पालेभाज्यांना धरून ठेवते.

कटर बार : पालेभाज्या कापण्यासाठी वापरले जाते.

कन्व्हेयर बेल्ट : कापलेल्या पालेभाज्या गोळा करण्यासाठी.

ड्राइव्ह व्हील व फ्रंट व्हील : यंत्र हलविण्यासाठी.

पीक गोळा करणारा बॉक्स : कापलेली पालेभाज्या जमा करण्यासाठी.

इलेक्ट्रॉनिक बॉक्स : यंत्रातील सर्व भाग नियंत्रित करण्यासाठी.

Vegetable Harvesting
Agriculture Harvesting : बटाटा, कांद्याची काढणी अंतिम टप्प्यात

कार्यक्षमता

पालक कापणी वेग ०.५३ मी/सेकंद

मेथी कापणी वेग ०.५३ मी/सेकंद

क्षेत्र क्षमता पालकासाठी ०.०६१ हेक्टर/तास, मेथीसाठी ०.०८७ हेक्टर/तास

कार्यक्षमता पालकासाठी ७५.८ टक्के, मेथीसाठी ८०.७८ टक्के

उत्पादकता पालकासाठी २१५ कि.ग्रॅ./तास, मेथीसाठी ४१४.८ कि.ग्रॅ./तास

ऊर्जेचा वापर आणि खर्च

पालकासाठी एकूण ऊर्जा गरज ४२३.२८ वॉट्‍स, तर मेथीसाठी ४३९.७ वॉट्स लागली. यंत्राचा प्रति तास खर्च २,२९३.८१ रुपये असून, कस्टम हायरिंगसाठी २५०.८७ रुपये ठरविण्यात आला आहे. पारंपरिक पद्धतींशी तुलना केली असता, वेळेत ८५.७१ टक्के बचत व खर्चात ५४.१२ टक्के बचत होते.

भविष्यातील विकास

यंत्रामध्ये विविध समायोज्य भाग असून, वेगवेगळ्या पालेभाज्यांवर प्रयोग करण्यासाठी ते उपयुक्त आहे. भविष्यात, पालेभाज्यांची पेंढी तयार करण्यासाठी तसेच रिमोट कंट्रोलची सोय करण्यासाठी सुधारणा करण्यात येणार आहेत.

- डॉ. सुजीत यमगर,

(कृषी उपकरणे आणि ऊर्जा विभाग, भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली) ९७३०७६४४७७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com