Turmeric  Agrowon
ॲग्रो विशेष

Turmeric Crop Issue : हिंगोली जिल्ह्यामध्ये हळद पिकामध्ये कंद सड

Turmeric Disease : जमिनीतील अतिरिक्त पाण्याचा व्यवस्थित निचरा न झाल्याने हळद पिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर कंदमाशीचा प्रादुर्भाव व कंदसड आढळून येत आहे.

माणिक रासवे : अॅग्रोवन वृत्तसेवा

Hingoli News : हिंगोली जिल्ह्यात यंदा मोसमी पाऊस सरासरीहून अधिक झाला. त्यानंतर मॉन्सूनोत्तर पाऊसही बरसला. जमिनीतील अतिरिक्त पाण्याचा व्यवस्थित निचरा न झाल्याने हळद पिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर कंदमाशीचा प्रादुर्भाव व कंदसड आढळून येत आहे. त्यामुळे हळदीच्या उत्पादकतेत ३० ते ४० टक्के घट येऊ शकते. मालाची (हळकुंड) प्रत खालावणार असल्याने अर्थकारणावर परिणाम होणार आहे.

जिल्ह्यात मागील तीन, चार वर्षांत अतिवृष्टी तसेच सततचा पाऊस तसेच पीक फेरपालट न केल्यामुळे हळद पिकांमध्ये कंदकुज तसेच कंदसड होण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेषतः वसमत, कळमनुरी तालुक्यांमधील पारंपरिक हळद उत्पादक पट्ट्यात कंद सडचे प्रमाण अधिक आहे.

यंदा ३ एकर हळद लागवड आहे. खूप मोठ्या प्रमाणावर कंद सड, कंद माशी, पर्ण करपा आढळून येत आहे. कीड, रोगाच्या नियंत्रणासाठी केलेला खर्च वाया गेला. हळदीचे नुकसान झाले आहे. पुढच्या वर्षी लागवडीसाठी घरचे बेणे उपलब्ध होते की नाही यांची खात्री राहिली नाही.
पकंज अडकिणे, शेतकरी, डोंगरकडा, ता. कळमनुरी, जि. हिंगोली
आमच्या भागात हळदीमध्ये मोठ्या प्रमाणावर कंद सड आढळून येत आहे. त्यामुळे हळदीच्या दर्जावर परिणाम होणार आहे. प्रतवारी घसरल्यामुळे कमी बाजार मिळून शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते.
प्रल्हाद बोरगड,अध्यक्ष, सूर्या फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी, लि.सातेफेळ, ता. वसमत, जि. हिंगोली
पारंपरिक हळद लागवड केल्या जाणाऱ्या भागात कंद सडचा प्रादुर्भाव अधिक दिसून येत आहे. त्यातुलनेत नवीन हळद लागवड सुरू झालेल्या भागात प्रादुर्भाव कमी आहे. पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीवर लागवड, कीड-रोगमुक्त बेण्याचा वापर, पीक फेरपालट, पाण्याचा गरजेनुसार योग्य वापर करुन जमीन वाफसा स्थितीत ठेवल्यास कंदसड टाळता येणे शक्य आहे. कंद सड झाल्यामुळे उत्पादकतेत ३० ते ४० टक्के घट येऊ शकते.
अनिल ओळंबे, उद्यानविद्या विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, तोंडापूर, ता. कळमनुरी, जि. हिंगोली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

State Cooperative Bank: राज्य सहकारी बँकेचे सोसायट्यांना पाठबळ

Agriculture Food Waste: भाजीपाला, फळांची वर्षाला दीड लाख कोटींची नासाडी

Cooperative Sector: सहकारातील संस्थांना अधिक स्वायत्तता

Paddy Crisis: भात उत्पादनाला बसणार फटका

Maharashtra Monsoon Rain: कोकण, घाटमाथा, मराठवाडा, विदर्भात मुसळधारेचा इशारा

SCROLL FOR NEXT