Washim News : तालुक्यात यावर्षात हळदीची मोठ्या क्षेत्रावर लागवड झालेली असून सध्या पिकावर कंदकुज व करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. त्याचा पिकाला फटका बसू शकतो, अशी चिंता शेतकरी व्यक्त करीत आहेत.
मॉन्सून परतला असून वातावरणामध्ये काहीसा बदल झालेला आहे. तापमानात वाढ झाली असून ऑक्टोबर हिटचा परिणाम जाणवत आहे. दररोज पहाटे धुके पडत आहे. याच काळात हळद पिकावर करप्यासह कंदकुज, करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
सोयाबीनचा हंगाम पूर्णपणे आटोपला असून यावर्षी या पिकाने शेतकऱ्यांची मोठी निराशा केली आहे. उत्पादनामध्ये घट आली असून अपेक्षित बाजारभावही मिळत नसल्यामुळे आधीच शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला आहे.
गतवर्षी हळदीला चांगला बाजार भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी हळदीच्या लागवडीमध्ये वाढ केली. सिंचनाची सुविधा असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याकडे एकर एकरापासून चार एकरांपर्यंत हळदीचे क्षेत्र आहे.
मागील पंधरवड्यापासून हळदीच्या पिकावर करपा, कंदकुज या रोगांचा प्रादुर्भाव झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. हळदीची पाने वाळल्यासारखी दिसत आहेत. हळद नऊ ते दहा महिने कालावधीचे पीक असून ऑक्टोबर ते डिसेंबर हा काळ कंदवाढीचा असतो. परंतु कंदाची वाढ होण्याच्या कालावधीतच रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.