Ginger Market  Agrowon
ॲग्रो विशेष

Ginger Market Deals : आले उत्पादक, व्यापाऱ्यांशी चर्चेतून तोडग्याचा प्रयत्न

Movement of Swabhimani Farmers Association : सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी सरसकट आल्याचे सौदे करावेत, असा निर्णय जाहीर केला आहे. परंतु त्याची अंमलबजावणी होत नसल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बाजार समितीत आंदोलन करत आल्याचे सौदे बंद पाडले होते.

Team Agrowon

Pune News : सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी सरसकट आल्याचे सौदे करावेत, असा निर्णय जाहीर केला आहे. परंतु त्याची अंमलबजावणी होत नसल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बाजार समितीत आंदोलन करत आल्याचे सौदे बंद पाडले होते. त्या पार्श्वभूमीवर रविवारी बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, सचिव डॉ. राजाराम धोंडकर, संचालक गणेश घुले यांनी बाजारात पाहणी करून विविध व्यापारी, शेतकरी यांच्याशी चर्चा केली.

बाजारात येणारे आले नविन आणि जुने असे एकत्रित येते. त्याची वर्गवारी करून अडते त्याचे सौदे करत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे म्हणणे आहे. यावर तोडगा काढण्यासाठी संपूर्ण बाजारात सभापती, सचिवांनी पाहणी करत आले व्यापाऱ्यांशी आणि उत्पादक शेतकऱ्यांशी चर्चा केली. याबाबत तोडगा काढण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहे.

एकत्रित आले विकले तर त्याला भाव मिळत नाही. तसेच त्यामुळे शेतकऱ्यांचेच नुकसान होईल. वर्गवारी केली तर भाव जास्त मिळेल. बाजार समितीत जास्त आले हे व्यापाऱ्यांनी खरेदी केलेले येते. शेतकऱ्यांचा माल थोडाच येतो. त्यामुळे व्यापाऱ्यांनी घेतलेला माल कसा विकायचा हा आमचा प्रश्न असल्याचा मुद्दा काही व्यापाऱ्यांनी मांडला. तसेच काही शेतकऱ्यांनी देखील वर्गवारी करूनच आले विकले गेले पाहिजे, असे म्हणणे मांडले. तर काही शेतकऱ्यांनी सरसकट सौदे करण्याची मागणी केली. त्यामुळे बाजार समिती यावर काय भूमिका घेणार याकडे शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

आले उत्पादक शेतकरी, व्यापाऱ्यांशी रविवारी (ता. २८) सविस्तर चर्चा केली. याबाबत पणन संचालकांशी सविस्तर चर्चा करून निर्णय घेतला जाईल.
डॉ. राजाराम धोंडकर, सचिव, बाजार समिती, पुणे.
बाजारात दाखल होणारा ९० टक्के माल व्यापाऱ्यांचा आहे. तो वर्गवारी करूनच बाजारात येतो. उर्वरित १० टक्के माल शेतकऱ्यांचा असतो. तो वर्गवारी करून अथवा वर्गवारी न करता जसा येतो, तशी त्याची विक्री केली जाते. वर्गवारी करून माल आल्यावर भाव चांगला मिळतो.
गणेश घुले, संचालक, बाजार समिती, पुणे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Harbhara Tur Kharedi: हरभरा-तूर खरेदीला मुदतवाढ; मेअखेरपर्यंत दिलासा

Jintur Water Shortage: जिंतूर तालुक्यातील ३ गावांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Yeola Acid Attack Case: ‘पोलिस मित्र’च निघाला शेतकऱ्यावरील अ‍ॅसिड हल्ल्याचा सूत्रधार

Parbhani Crop Insurance: परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण विमा परतावा द्या: कृषिमंत्री भरणे

Sustainable Farming: शेतकऱ्यांनी शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करावा

SCROLL FOR NEXT