Farmers produce : आता शेतकऱ्यांचा माल थेट अ‍ॅमेझॉन, बिग बास्केट आणि  फ्लिपकार्टवर मिळणार!

Agricultural value chain : अ‍ॅमेझॉन, बिग बास्केट, फ्लिपकार्ट यांसारख्या आंतरराष्ट्रीय शॉपींग साईटवर जगभरातला उत्कृष्ट माल मिळतो. आता या प्लॅटफॉर्मवर शेतकऱ्यांचा मालास जागा मिळाली आहे. येथून शेतकऱ्याचा माल विकला जाणार आहे. 
Farmers produce
Farmers produceAgrowon
Published on
Updated on

Pune news : राज्यातील शेतकऱ्यांच्या मालास योग्य आणि चांगली किंमत मिळावी यासाठी राज्य शासनाने अ‍ॅमेझॉन, बिग बास्केट, फ्लिपकार्ट यांसारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्याबरोबर सामंजस्य करार केला आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आपला माल थेट अ‍ॅमेझॉन, बिग बास्केट, फ्लिपकार्ट यांसारख्या कंपन्यांना विकता येणार आहे. याबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे कृषी मूल्य साखळी भागीदारी बैठक सोमवार (२९ रोजी) महत्वपूर्ण बैठक पार पडली. यात बैठकीत हा करार झाला. यावेळी अशा आंतरराष्ट्रीय कंपन्याची शेतकरी बांधवांना गरज असल्याचे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. 

कृषी विभाग, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन (MITRA ), मा.बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्प आणि ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशन (VSTF) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषी मूल्य साखळी भागीदारी बैठक -२०२४ मध्ये ते बोलत होते. यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते. तर त्यांच्या उपस्थितीत ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशन व ओएनडीसी यांच्यात सामंजस्य करार झाला. 

राज्यातील शेतकऱ्याला नुकसानभरपाई आणि सबसिडीतून बाहेर काढण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. तर राज्य सरकारकडून कृषी मूल्य साखळीचा दुसरा टप्प्यास सुरूवात करण्यात आल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले. तर २०१४-१९ या कालावधीत शेती क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, स्मार्ट योजना आणि वातावरणपूरक शेतीचा प्रयोग केला जात आहे. तर शेतकऱ्यांना थेट बाजाराशी जोडण्याचा निर्णय घेताना कृषी मूल्य साखळी योजनेचा प्रारंभ करण्यात आल्याचे सांगत त्यांनी दुसरा टप्पा सुरू केल्याबद्दल कृषीमंत्री मुंडे यांचे अभिनंदन केले. तसेच राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे असल्याचे ते म्हणाले. 

Farmers produce
Devendra Fadnavis : शेतकऱ्यांचे हित, उद्योग-व्यापाराचे रक्षण केले जाईल ः देवेंद्र फडणवीस

यावेळी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी, शेतकर्‍यांनी शेती विषयक विचार करताना, शेतीकडे एक उद्योग म्हणून पाहावे. त्या अनुशंगाने शेती करावी. तरच शेती आणि शेतकर्‍यांचे प्रश्न मार्गी लागतील असे प्रतिपादन केले. तसेच अमेझॉन, फ्लिपकार्ट, हिंदुस्तान युनीलिव्हर, टाटा यांसारख्या मोठ्या कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा माल बाजारपेठेत जाईल असेही ते म्हणाले.  

तसेच स्मार्ट प्रकल्प अंतर्गत शेतकऱ्यांच्या शेत मालास बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय व देशातील महत्त्वपूर्ण कंपन्यांशी करार करण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला चांगला दर मिळेल. तर पंतप्रधान यांच्या पाच ट्रिलियनच्या उद्देशात महाराष्ट्राचा वाटा एका ट्रिलियनचा असेल. त्यासाठी कृषी आणि संलग्न क्षेत्रात सध्याचा वाटा हा सात टक्के असून तो सोळा टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असेही मुंडे यांनी म्हटले आहे.

Farmers produce
Devendra Fadnavis : विदर्भातील सर्व जिल्हे जलयुक्त करणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

तर या करारामुळे शेतकरी उत्पादक कंपन्यांशी जोडले जातील. बाजाराच्या गरजा, गुणवत्ता मानके आणि खरेदी प्रक्रियांवर शेतकरी थेट कॉपोरेट खरेदीदार आणि किरकोळ विक्रेत्यांशी थेट संबंध प्रस्थापित करतील. त्यासाठी ही साखळी भागीदारी बैठक उपयुक्त ठरेल असा विश्वास मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला.

या बैठकीला कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनूप कुमार, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन (MITRA ) चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशी, ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त प्रवीण गेडाम, फ्लिपकार्टचे रजनीश कुमार, अमरेंद्र मिश्रा, अतुल जैन मनदीपसिंग टुली अमेझॉनचे विवेक धवन तसेच विविध आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवरील कंपन्यांचे प्रतिनिधी  उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com