Potato Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Potato Cultivation : आंबेगावात ट्रॅक्टरने बटाटा लागवडीकडे कल

Latest Agriculture News : तालुक्यातील लौकी, महाळुंगे पडवळ, कळंब, चास आदी ३० गावांत रब्बी हंगामातील बटाटा लागवडीच्या कामांना शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे.

Team Agrowon

Pune News : तालुक्यातील लौकी, महाळुंगे पडवळ, कळंब, चास आदी ३० गावांत रब्बी हंगामातील बटाटा लागवडीच्या कामांना शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. मजुरांच्या टंचाईवर मात करण्यासाठी ट्रॅक्टरच्या साह्याने आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे.

हुतात्मा बाबू गेनू सागर (डिंभे धरण) १०० टक्के भरले आहे. त्यामुळे उजवा व डावा कालव्याच्या पाणलोट क्षेत्रातील गावांतील शेतकरी प्रामुख्याने बटाटा लागवड करत असल्याचे पाहावयास मिळत आहे. त्यामध्ये लौकी, चांडोली बुद्रुक, कळंब, महाळुंगे पडवळ, नांदूर, टाकेवाडी, विठ्ठलवाडी, थोरांदळे आदी २० गावे बटाटा उत्पादनात अग्रेसर आहेत.

बटाटा लागवडीसाठी मजूर उपलब्ध होत नाही. त्यामुळे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या साह्याने आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे लागवड केली आहे. सरासरी आठशे ते एक हजार रुपये तास या प्रमाणे ट्रॅक्टरद्वारे लागवडीचा दर आहे.

यंत्राद्वारे लागवड केल्यामुळे बियाणे जमिनीत गाडून सरी वरंबा तयार होतो. त्यात वेळ, पैसा व खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होते. त्यामुळे शेतकरी वर्ग ट्रॅक्टरच्या साह्याने बटाटा लागवड करीत आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी १० ते १५ टक्क्यांनी बटाटा लागवड क्षेत्रात वाढ होईल, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

‘‘मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत खेड, जुन्नर, शिरूर प्रमाणेच बीड, औरंगाबाद, उस्मानाबाद, नगर आदी भागांतून शेतकरी बटाटा वाण खरेदीसाठी येतात. या वर्षी २४ हजार ७०० क्विंटल बटाटा बियाण्याची आवक झाली आहे. पुखराज जातीच्या प्रमाणित बटाटा वाणाला (बियाण्याला) प्रतवारीनुसार एक हजार ६०० रुपये ते दोन हजार ३०० रुपये क्विंटल बाजारभाव आहे,’’ असे मंचर बाजार समितीचे सभापती वसंतराव भालेराव यांनी सांगितले.

‘‘लौकी येथे चार एकर क्षेत्रात पुखराज जातीच्या बटाटा बियाण्याची लागवड केली आहे. त्यासाठी मंचर बाजार समितीतून २६ क्विंटल बियाणे खरेदी केले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे बटाटा बियाण्याची लागवड केली आहे. औषधे, खते, बियाणे, मजुरी असा दोन लाख ७५ हजार रुपये खर्च झाला आहे,’’ असे शेतकरी लक्ष्मण भिकाजी काळे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agricultural Center Strike: ‘साथी पोर्टल’ विरोधात सोमवारी विदर्भात कृषी केंद्रधारकांचा बंद

Vidhan Parishad Opposition Leader : सतेज पाटील विधान परिषेदेचे विरोधी पक्षनेते?

Heavy Rain Issue: उत्तरेकडील पावसाने केळी बाजाराला फटका

Fish Price: मासळीच्या दरात सुधारणा

Onion Procurement Irregularities: कांदा खरेदीतील ‘सप्लाय व्हॅलिड’ एजन्सी संशयाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT