Ghansal Rice Agrowon
ॲग्रो विशेष

Ghansal Rice: आजऱ्यात घनसाळ भाताच्या लागवडीकडे कल

Indrayani Drop: इंद्रायणी तांदळाच्या दरात झालेल्या घसरणीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागले. त्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा इंद्रायणीकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे.

Team Agrowon

Kolhapur News: इंद्रायणी तांदळाच्या दरात झालेल्या घसरणीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागले. त्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा इंद्रायणीकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे. याउलट आजरा घनसाळ तांदळाला चांगला दर मिळाल्याने शेतकरी घनसाळ लागवडीकडे वळला आहे. यंदा घनसाळीचे क्षेत्र दुपटीने वाढणार आहे.

आजरा इंद्रायणी म्हटले, की ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड उडते. बाजारपेठेत अन्यत्र पिकणाऱ्या इंद्रायणी भातापेक्षा आजरा इंद्रायणीला प्रतिकिलो पाच ते सहा रुपये अधिक दर मिळतो. दर वर्षी व्यापाऱ्यांकडून आजरा इंद्रायणीची मागणी मोठ्या प्रमाणात असते, पण यंदा हे चित्रच बदलले आहे. बाजारपेठेची मागणी लक्षात घेता गत वर्षी तालुक्यात इंद्रायणीच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली.

मात्र, या तांदळाला म्हणावा तसा दर मिळाला नाही. गतवर्षीच्या तुलनेत यंदा इंद्रायणीच्या दरात प्रतिक्विंटल ११०० रुपयांनी घट झाली. प्रतिक्विंटल ३३०० रुपये असणारा दर यंदा २२०० रुपयांपर्यंत घसरला. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले. भाताची म्हणावी तशी उचल झाली नाही.

याउलट आजरा घनसाळ भाताला चांगला दर राहिला. व्यापाऱ्यांकडून चांगल्या दराबरोबर ग्राहकांकडून तांदळाला मागणीही चांगली राहिली आहे. शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल सहा हजार रुपये दर मिळाला आहे. यंदा मार्केट तेजीत राहिल्याने शेतकरी घनसाळ लागवडीकडे वळला असून घनसाळीच्या क्षेत्रात यंदा दुपटीने वाढ होण्याची शक्यता आहे,

आजरा घनसाळची प्रमुख वैशिष्ट्ये

सुवासिक: या तांदळाला एक विशिष्ट आणि तीव्र सुगंध असतो, ज्यामुळे याला "घनसाळ" (घन म्हणजे सुगंध आणि साळ म्हणजे भात) असे नाव मिळाले आहे.

पौष्टिक: हा तांदूळ कॅल्शियमयुक्त, पौष्टिक आणि सात्विक मानला जातो. यात स्निग्ध पदार्थ आणि कॅरोटीन कमी प्रमाणात असतात, पण टरफलामध्ये ''बी'' जीवनसत्त्वाचे प्रमाण चांगले असते.

लहान दाणे: याचे दाणे लहान आणि आकर्षक असतात.

औषधी गुणधर्म: काही माहितीनुसार, या तांदळाला औषधी गुणधर्म असून तो पचायला हलका असतो आणि मधुमेह असलेल्या लोकांसाठी चांगला मानला जातो.

सेंद्रिय शेती: आजरा तालुक्यातील अनेक शेतकरी सेंद्रिय पद्धतीने घनसाळ तांदळाचे उत्पादन घेतात.

आजरा घनसाळ भात पुरेसा उपलब्ध नाही. बाजारपेठेत मागणी मात्र कायम आहे. यंदा घनसाळला प्रतिक्विंटल सहा हजार रुपये दर मिळाला आहे. तांदळाचा दर प्रतिकिलो ११० ते १२० रुपयापर्यंत गेला आहे. त्यामुळे यंदा आजरा घनसाळचे क्षेत्र दुपटीने वाढणार आहे. शेतकऱ्यांकडे घनसाळ बियाण्याची मागणी वाढली आहे.
- संभाजीराव सावंत, अध्यक्ष, आजरा तालुका शेतकरी मंडळ, आजरा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Price Issue: कापसाचे दर पडण्यास शासन जबाबदार

Banana Price: गुणवत्ता निकषावर मालाला मिळणार दर

Agriculture Technology: नव्या तंत्रज्ञानामुळे देशात कृषी क्षेत्रात क्रांती

Global Sugar Production: जागतिक बाजारात साखर पुरवठा वाढणार

Monsoon Heavy Rain: घाटमाथ्यावर जोरदार सरी

SCROLL FOR NEXT