Sand Policy Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Sand Policy : डेपोपासून वाळूचा वाहतूकखर्च आवाक्याबाहेर

Sand Rate : सर्वसामान्य नागरिकांना स्वस्तात अथवा परवडणाऱ्या दरात वाळू उपलब्ध व्हावी यासाठी नवे धोरण शासनाने नुकतेच जाहीर केले.

Team Agrowon

Jalgaon Sand Rate : सर्वसामान्य नागरिकांना स्वस्तात अथवा परवडणाऱ्या दरात वाळू उपलब्ध व्हावी यासाठी नवे धोरण शासनाने नुकतेच जाहीर केले. मात्र त्याच्या अंमलबजावणीतील अडचणी आणि प्रत्यक्षात वाळू नदीपात्रापासून डेपोपर्यंत व डेपोपासून पुढे ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी येणाऱ्या वाहतूक खर्चाचा हिशोब मांडला, तर ग्राहकाचे ‘आर्थिक कंबरडे’ मोडणारा आहे.

अवैध वाळूउपसा व त्यातून वाढलेली गुन्हेगारी, हप्तेखोरी ही सामान्य बाब. त्यातूनच शासनाने ग्राहकांना परवडेल व त्यातील हप्तखोरी, भ्रष्टाचारही कमी होईल, या उद्देशाने नवे धोरण जाहीर केले. त्याची अंमलबजावणी १ मेपासून करण्याचे नियोजन होते.

तीन ब्रासच्या गाडीसाठी साडेअकरा हजार

वाळूउपसा व विक्रीच्या नव्या धोरणानुसार जिल्हा प्रशासनाने लिलाव काढलेल्या वाळूगट, डेपोंपासून प्रमुख मागणी असलेल्या जळगाव शहरापर्यंत वाळू आणण्यासाठी हिशोब केला तर तो असा : प्रतिब्रास ६०० रुपये व ६० रुपये खनिज प्रतिष्ठानचे, असे ६६० रुपये रॉयल्टी भरावी लागेल. डेपो पद्धतीत पात्रातून डेपोपर्यंत आणावी लागेल. त्यास प्रतिब्रास साधारणतः एक हजार रुपये.

एका गाडीत सुमारे तीन ब्रास वाळू येते. ती रॉयल्टीप्रमाणे एक हजार ९६० रुपयांची. ती डेपोपर्यंत आणण्याचा खर्च तीन हजार रुपये. नुकत्याच निविदा काढलेल्या डेपोपासून जळगावपर्यंत वाळू आणायची म्हटल्यास वाहनाला किमान ६० किलोमीटर अंतर कापावे लागेल.

धोरणानुसार प्रतिटन प्रतिकिलोमीटर ८ रुपये दराने प्रतिब्रास (साडेचार टन) प्रतिकिलोमीटर ३६ यानुसार, तीन ब्रास (एका वाहनातील) वाळूचे १०८ रुपये प्रतिकिलोमीटर या दरानुसार ६० किलोमीटरसाठी सहा हजार ४८० रुपये होतात. त्यात तीन ब्रास वाळूचे १,९८० रुपये, तीन हजार रुपये नदीपात्रातून डेपोपर्यंत आणण्याचा खर्च. हे एकत्रित केले तर एका गाडीसाठी म्हणजे तीन ब्राससाठी ११ हजार ४६० रुपये खर्च येतो.

अन्य गटांच्या लिलावासाठी पर्यावरणाकडे प्रस्ताव नाहीत प्रशासनाने नुकतेच जाहीर केलेल्या लिलावप्रक्रियेत रावेर, अमळनेर, धरणगाव तालुक्यांतील गटांचा समावेश होता. अन्य डेपोंचा लिलाव केवळ पर्यावरण विभागाची परवानगी नसल्याने समाविष्ट होऊ शकला नाही.

..या डेपोंसाठी होता लिलाव

वाळूगट साठा

केऱ्हाळे बुद्रुक (ता. रावेर) - १७६७

पातोंडी (ता. रावेर)- १७७६

दोधे (ता. रावेर) - २१४७

धावडे (ता. अमळनेर) - ६३६०

बाभूळगाव-१ (ता. धरणगाव) -२७३५

बाभूळगाव-२ (ता. धरणगाव) - ३९३३

शासकीय कामासाठी राखीव

भोकर (ता. जळगाव) - १२०८५

तांदळी (ता. अमळनेर) - ५३२७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Lasunghas cultivation: पौष्टिक लसूणघास चारा पिकाचे लागवड तंत्र

Winter Cow Care: हिवाळ्यातील संकरित गाईंच्या आरोग्याचे व्यवस्थापन

Solar Irrigation: वीज नसली तरी द्या पिकांना पाणी; सौर उर्जेवर आधारित सिंचन प्रणाली शेतकऱ्यांसाठी फायद्याची

Rabi Season: जमिनी वाफशाला; रब्बीची तयारी सुरू

India Urea Plant in Russia: रशियात भारताचा पहिला युरिया प्रकल्प, चीनच्या निर्यात निर्बंधांनंतर उचलले मोठे पाऊल

SCROLL FOR NEXT