Organic Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Organic Farming : सोलापुरातील शेतकऱ्यांना हैदराबादच्या संस्थेत सेंद्रिय शेतीवर प्रशिक्षण

Farmers Training : आत्माच्या प्रकल्प संचालक सौ. शीतल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय वनस्पती संरक्षण प्रशिक्षण संस्था, (एनआयपीएचएम) हैदराबाद येथे १८ ते २२ जून दरम्यान हे प्रशिक्षण पार पडले.

Team Agrowon

Solapur News : कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या (आत्मा) वतीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हैदराबादच्या राष्ट्रीय वनस्पती संरक्षण प्रशिक्षण संस्थेत नुकतेच प्रशिक्षण देण्यात आले.

आत्माच्या प्रकल्प संचालक सौ. शीतल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय वनस्पती संरक्षण प्रशिक्षण संस्था, (एनआयपीएचएम) हैदराबाद येथे १८ ते २२ जून दरम्यान हे प्रशिक्षण पार पडले. यामध्ये जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील ३५ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.

अन्नधान्याच्या आणि संकरित वाणांच्या तसेच इतर पिकांच्या अधिक उत्पादनासाठी रासायनिक खते, कीटकनाशके, बुरशीनाशके आणि तणनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडून जमिनीतील जैविक घटकांचा विनाश झाल्याने जमिनी मृतवत होत चालल्या आहेत.

मातीची सुपीकता वाचविण्यासाठी व विषमुक्त अन्न मिळण्यासाठी शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण महत्त्वाचे आहे, त्यासाठी हे प्रशिक्षण आयोजिल्याचे प्रकल्प संचालक चव्हाण यांनी सांगितले

सेंद्रिय शेतीबाबत सर्वंकष मार्गदर्शन

या प्रशिक्षणामध्ये सेंद्रिय शेतीची सद्यपरिस्थिती, सेंद्रिय शेतीचे मूलभूत घटक, सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन, सेंद्रिय पद्धतीने प्रमुख पिकांचे उत्पादन तंत्रज्ञान, सेंद्रिय खतांची निर्मिती, सेंद्रिय शेतीमध्ये पशू संवर्धनाचे व्यवस्थापन, सेंद्रिय शेतीमध्ये कीड व रोग व्यवस्थापन, सेंद्रिय भाजीपाला आणि फळपिके उत्पादन तंत्रज्ञान, सेंद्रिय शेतीमाल विक्री साखळी व निर्यात, सेंद्रिय शेती प्रमाणीकरण पद्धती आणि मानके आदी महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन झाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT