Organic Farming
Organic FarmingAgrowon

Organic Farming : सेंद्रिय शेती शेतकऱ्यांना सर्वदृष्ट्या फायदेशीर

Tatyasaheb Magar : कमी खर्चातील सेंद्रिय शेतीच शेतकऱ्यांना सर्वदृष्ट्या फायदेशीर ठरू शकते,’’ असे मत सेंद्रिय शेतीतले प्रयोगशील शेतकरी तात्यासाहेब मगर यांनी मोहोळ येथे व्यक्त केले.

Solapur News : ‘‘रासायनिक खते आणि कीटकनाशक-बुरशीकांच्या अतिवापरामुळे आरोग्यावर होणाऱ्या परिणामाचा विचार करता कमी खर्चातील सेंद्रिय शेतीच शेतकऱ्यांना सर्वदृष्ट्या फायदेशीर ठरू शकते,’’ असे मत सेंद्रिय शेतीतले प्रयोगशील शेतकरी तात्यासाहेब मगर यांनी मोहोळ येथे व्यक्त केले.

मोहोळ येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रात आयोजित पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन कार्यक्रमांतर्गत आयोजित शेतकऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात मगर बोलत होते. या वेळी स्वतः मगर यांनी सेंद्रिय शेतीबाबतची विविध प्रकारची प्रात्यक्षिकेही करून दाखविली.

Organic Farming
Organic Farming : जमिनीच्या उत्तम आरोग्यासाठी नैसर्गिक, सेंद्रिय शेती गरजेची

‘केविके’चे कार्यक्रम समन्वयक डॉ. तानाजी वळकुंडे, विषय विशेषज्ञ काजल म्हात्रे, विषय विशेषज्ञ पंकज मडावी, दिनेश क्षीरसागर, स्वाती कदम, विशाल वैरागर या वेळी उपस्थित होते. श्री. मगर म्हणाले, ‘‘शेतीमध्ये सातत्याने होत असलेला रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर आणि त्यामुळे खालावलेला जमिनीचा पोत यामुळे शेतीवर परिणाम होतो आहेच, पण या अन्नधान्यामुळे मानवी आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे.

Organic Farming
Organic Farming : सेंद्रिय शेतीचे क्षेत्र १ लाख हेक्टरपर्यंत विस्तारण्यासाठी प्रयत्न करा

त्यातही सर्वाधिक वाईट म्हणजे आज सेंद्रियच्या नावाखाली सुरू असलेला काळाबाजार धक्कादायक आहे. कोणीही उठते आहे आणि सेंद्रिय म्हणून शेतीमाल आणि पदार्थांची विक्री करतो आहे. पण त्याची खात्री काय, याचा विचार व्हायला हवा.’’ डॉ. वळकुंडे यांनी या मिशनच्या आयोजनामागचा हेतू सांगितला. म्हात्रे यांनीही जैविक मिशनबाबत शेतकऱ्यांनी जागरूक राहून या उपक्रमात सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.

८०० शेतकऱ्यांना प्रशिक्षण

या प्रशिक्षण कार्यक्रमात शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीतील तांत्रिक प्रशिक्षणासह बीजामृत, जिवामृत, अमृतपाणी, दशपर्णी अर्क, कृपा अमृत यांसारख्या विविध सेंद्रिय निविष्ठांची निर्मितीची प्रात्यक्षिकेही करून दाखविण्यात आली. या कार्यक्रमातून जिल्ह्यातील पंढरपूर, माळशिरस, माढा, मोहोळ, सांगोला आणि करमाळा तालुक्यातील दोन टप्प्यांत प्रत्येकी ४०० या प्रमाणे ८०० शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com