Solapur News : डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनअंतर्गत मोहोळच्या कृषी विज्ञान केंद्रात सेंद्रिय निविष्ठा निर्मितीसह विविध विषयांवर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. शेतकऱ्यांनीही उत्स्फूर्तपणे यात सहभागी घेत या प्रशिक्षणाला प्रतिसाद दिला. तसेच सेंद्रिय शेती, निविष्ठा निर्मितीची माहिती जाणून घेतली.
शेतकऱ्यांमध्ये सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेती करण्यामध्ये उत्साह निर्माण करणे, हा या प्रशिक्षण कार्यक्रमाचा उद्देश होता. जिल्ह्यातील माढा, करमाळा, पंढरपूर, मोहोळ, माळशिरस आणि सांगोला या तालुक्यांतील शेतकऱ्यांनी यात सहभाग घेतला. शेतकऱ्यांना सेंद्रिय निविष्ठा कशाप्रकारे कमी खर्चामध्ये कमी वेळेमध्ये तयार करता येतील,
यासाठी ए. एन. जाधव यांनी घन जिवामृत, जिवामृत, दूध गूळ अंडी संजीवक त्याचबरोबर मासे गूळ, अग्निअस्त्र आद्रक, गूळ बुरशीनाशक आणि ह्युमिक ॲसिड व जिवामृत इत्यादी निविष्ठा तयार करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले.
प्रात्यक्षिक करताना शेतकऱ्यांना ह्युमिक ॲसिड तयार करण्यासाठी फक्त ताक गूळ आणि गोमूत्र या गोष्टींचा वापर करून एक चांगल्या प्रकारचे ह्युमिक ॲसिड तयार करता येते आणि त्याचा फायदा पिकांच्या पांढऱ्या मुळांची संख्या वाढवण्यासाठी होतो. त्याचबरोबर पिकांची अन्न शोषण घेण्याची क्षमता वाढते व जोमदार वाढ होते, या गोष्टी व इतर अनेक निविष्ठा निर्मिती करणे त्याचे फायदे इत्यादी बद्दलही मार्गदर्शन करण्यात आले.
या अभियानासाठी कृषी विज्ञान केंद्र मोहोळ येथे काजल म्हात्रे या नोडल अधिकारी म्हणून काम बघत आहेत. या प्रशिक्षणामध्ये दिनेश क्षीरसागर, म्हात्रे, डॉ. पंकज मडावी, स्वाती कदम या तज्ज्ञ मंडळींनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी तुषार अहिरे, सुयोग ठाकरे, ज्ञानेश्वर तांदळे, नितीन बागल, बनसोडे यांचे सहकार्य लाभले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.