Farmer Protest : चार पिकांची हमीभावाने खरेदी करण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव; शेतकरी नेते म्हणाले, "चर्चा करू... | राज्यात काय घडलं?

पुढील पाच वर्षांसाठी तूर डाळ, उडीद डाळ, मसूर, कापूस आणि मक्याची कोणत्याही बंधनाशिवाय नाफेड आणि एनसीसीएफ हमीभावाने खरेदीचे करार करतील, असा प्रस्ताव दिला आहे. त्यासाठी खरेदी पोर्टल विकसित करणार आहे.' असं गोयल म्हणाले.
Delhi Farmers Protest
Delhi Farmers ProtestAgrowon

बैठकीत तोडगा नाहीच?

केंद्रीय मंत्री समिती आणि शेतकरी आंदोलकांच्या बैठकीची! तीन केंद्रीय मंत्री पियुष गोयल, अर्जुन मुंडा, नित्यानंद राय यांनी संयुक्त किसान मोर्चा आणि संयुक्त मजूर मोर्चाच्या नेत्यांशी रविवारी (ता.१८) बैठकीत चर्चा केली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना वाणिज्य मंत्री पियुष गोयल म्हणाले, बैठकीत सकारत्मक चर्चा झाली आहे. शेतकरी नेत्यांनी हमीभावाची मागणी केली आहे. पुढील पाच वर्षांसाठी तूर डाळ, उडीद डाळ, मसूर, कापूस आणि मक्याची कोणत्याही बंधनाशिवाय नाफेड आणि एनसीसीएफ हमीभावाने खरेदीचे करार करतील, असा प्रस्ताव दिला आहे. त्यासाठी खरेदी पोर्टल विकसित करणार आहे.' असं गोयल म्हणाले.

यावर मजूर किसान मोर्चाचे नेते श्रवण पंढेर यांनी इतर संघटनांशी चर्चा करून निर्णय घेऊ असं म्हणाले. पंढेर म्हणाले, "केंद्रीय मंत्र्यांनी माध्यमासमोर बोलताना दिलेल्या प्रस्तावावर आम्ही १९ आणि २० फेब्रुवारी रोजी तज्ञाशी चर्चा करणार आहोत. त्यानंतर निर्णय घेऊ. तोवर आम्ही दिल्ली चलो मोर्चा थांबवत आहोत. केंद्रीय मंत्र्यांनी दिलेल्या प्रस्तावावर सविस्तर चर्चा करू. त्यातून मार्ग निघाला नाही तर मात्र २१ फेब्रुवारीपासून सकाळी ११ वाजता दिल्लीकडे कूच करणार आहोत." असं श्रवण पंढेर म्हणाले.

हमीभाव कायद्याच्या मागणीसह स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी आणि कर्जमाफी या शेतकरी नेत्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. त्यावर केंद्रीय मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये चौथ्या दिवशी चार चर्चा झाली. पण तोडगा काही निघाला नाही. या बैठकीनंतर चार पिकांची हमीभावानं खरेदीचा प्रस्ताव देण्यात आल्याचं गोयल यांनी सांगितलं. नावीन्यपूर्ण आणि असाधारण संकल्पनांवर या बैठकीत चर्चा झाल्याचं गोयल म्हणाले. किसान संयुक्त मोर्चाचे नेते जगजीत सिंह डल्लेवाल यांनी हमीभावाचा कायदा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी आणि कर्जमाफीच्या मागणीवर चर्चा रखडलेल्याचं सांगितलं. १३ फेब्रुवारी रोजी दिल्ली चलो आंदोलन पुकारण्यात आलं होतं. त्यानंतर पंजाब-हरियाणाच्या शंभू सीमेवर शेतकऱ्यांना पोलिसांनी अडवलं आहे.  

Delhi Farmers Protest
E U Farmers Protest: युरोपियन महासंघात पुन्हा शेतकरी आंदोलनाचा भडका का उडाला? | ॲग्रोवन | Agrowon

विशेष अधिवेशन!

मराठा समाजाला टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यासाठी उद्या राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलवलंय. ओबीसी किंवा कुठल्याही समाजावर अन्याय न करता आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन बोलण्यात आल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. शिवजयंती निमित्त शिवनेरीवर विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी मुख्यमंत्री उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मनोज जरांगे यांनी सगेसोयऱ्यांबाबत अंतिम निर्णय होत नाही तोवर उपोषण सुरू राहील, असा इशारा दिला. जरांगे म्हणाले, "२० फेब्रुवारीला सरकार अधिवेशन घेणार आहे. पण सगेसोयऱ्याच्या कायदाबद्दल कोणतेही स्पष्टता सरकारकडून दाखवली गेली नाही. सरकार भूमिका स्पष्ट करत नाही तोवर उपोषण सुरूच राहील, असा इशारा जरांगे यांनी दिला.

लसणाच्या चोरी!

यंदा कमी पावसामुळे प्रमुख लसूण उत्पादक राज्यात उत्पादकता घटली. त्यामुळं लसणाच्या किमतीत वाढ झाली. सध्या प्रमुख शहरातील मोजक्या किरकोळ बाजारात ४०० ते ५०० रुपये किलोचा लसणाला मिळतो. मध्यप्रदेशमध्ये मात्र या किमतीत वाढल्यानं शेतातून लसणाची चोरी करण्याचे घडत आहेत. छिंदवाडा जिल्ह्यातील शेतकरी राहुल देशमुख यांनी चोराच्या भीतीने शेतात सीसीटीव्ही लावले आहेत. महाराष्ट्रातील बाजार समित्यात आवक कमी झाल्यानं सरासरी १५ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर लसणाला मिळतोय. मध्यप्रदेश, गुजरात या प्रमुख राज्यात लसणाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. पण दर वाढल्यानं लसूण चोरीचे प्रकारही वाढले आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांनी शेतात सीसीटीव्ही बसवले आहेत.

उन्हाचा चटका वाढणार!

राज्यात पहाटेचा गारठा कमी झाला आहे. तर किमान तापमानात वाढ झाली आहे. दुपारी उन्हाचा चटकाही वाढू लागला आहे. राज्यात उन्हाचा चटका वाढू शकतो. तसेच पुढील पाच कोरड्या हवामान राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मागील २४ तासात नाशिक येथे १४ अंश सेल्सियस सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. तर पुढील चोवीस तासात किमान तापमानात ३ ते ४ अंश सेल्सियसने चढ-उतार राहील, असा अंदाजही हवामान विभागाने दिला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com