Agriculture Training : शेतकरी, अधिकाऱ्यांसाठी ‘केव्हीके’त नैसर्गिक शेती प्रशिक्षण

Agriculture Mission : डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनअंतर्गत ‘आत्मा’च्या सहकार्याने कृषी विज्ञान केंद्र स्तरावर दोन दिवसीय शेतकरी व अधिकारी प्रशिक्षण घेण्यात आले.
Agriculture Training
Agriculture TrainingAgrowon

Akola News : डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनअंतर्गत ‘आत्मा’च्या सहकार्याने कृषी विज्ञान केंद्र स्तरावर दोन दिवसीय शेतकरी व अधिकारी प्रशिक्षण घेण्यात आले. जळगाव जामोद ‘केव्हीके’मध्ये नांदुरा व खामगाव तालुक्यामधील गटातील शेतकरी व अधिकारी, कर्मचारी प्रशिक्षण १३ ते १६ फेब्रुवारी या कालावधीत झाले.

या प्रशिक्षणाचे उद्‍घाटन ‘केव्हीके’चे वरिष्ठ शास्त्रज्ञ विकास जाधव यांनी केले. प्रास्ताविकात कृषीविद्या शास्त्रज्ञ संजय उमाळे यांनी प्रशिक्षणाचा उद्देश व हेतू समजावून सांगितला. तांत्रिक सत्रामध्ये विकास जाधव यांनी नैसर्गिक शेतीची गरज, उद्दीष्टे व प्रमाणीकरण या विषयी सांगितले.

Agriculture Training
Farmer Training : तोंडापूर कृषी विज्ञान केंद्रात नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण

श्री. उमाळे यांनी नैसर्गिक शेतीमध्ये जमीन आरोग्य व्यवस्थापन, जैविक निविष्ठानिर्मिती बीजामृत, जीवामृत, वाफसा, आच्छादन, जिवाणू खते, हिरवळीची खते, सहयोगी पिकांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. पीक संरक्षण शास्त्रज्ञ अनिल गाभणे यांनी नैसर्गिक शेतीतील कीड व रोग नियंत्रण, सर्वेक्षण पद्धती, मित्र कीडीची ओळख व संवर्धनाविषयी मार्गदर्शन केले.

Agriculture Training
Poultry Training : कळवणमधील महिलांना कुक्कुटपालनाचे धडे

शास्त्रज्ञ नितीन तळोकार यांनी जल व मृदा संवर्धनाविषयी मार्गदर्शन केले. दुसऱ्या दिवशीच्या सत्रात नैसर्गिक शेतीसाठी आवश्यक निविष्ठा निर्मितीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले तसेच नैसर्गिक शेती करणारे शेतकरी भानुदास वनारे यांनी नैसर्गिक शेतीत वापरण्यात येणाऱ्या निविष्ठांची कृती करून दाखवली.

समारोपीय सत्रात फळबाग शास्त्रज्ञ शशांक दाते, पशुसंवर्धन शास्त्रज्ञ डॉ. विनोद जानोदकर व विस्तार शास्त्रज्ञ श्यामसुंदर बोर्डे यांनी मार्गदर्शन केले. कृषी सहायक श्री. बोराडे यांनी प्रशिक्षणाबाबत प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com