Pune APMC  Agrowon
ॲग्रो विशेष

Pune APMC : पुणे बाजार समिती वाहतूक कोंडीच्या विळख्यात

Pune APMC Traffic Issue : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील आणि बाहेरील वाहतूक व्यवस्थापनावर संचालक मंडळाचे दुर्लक्ष झाल्याने, बाजार समिती आवार आणि परिसर वाहतूक कोंडीच्या विळख्यात अडकली आहे.

Team Agrowon

Pune News : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील आणि बाहेरील वाहतूक व्यवस्थापनावर संचालक मंडळाचे दुर्लक्ष झाल्याने, बाजार समिती आवार आणि परिसर वाहतूक कोंडीच्या विळख्यात अडकली आहे.

याचा फटका शेतीमालाची वाहने बाजार आवारात आणणे, खरेदी-विक्री झालेला शेतीमाल बाजार आवारातून बाहेर काढणे आणि विक्रीसाठी योग्य वेळेत बाजारपेठेत पोहोचविणे जिकिरीचे झाल्याने शेतकरी, खरेदीदार आणि अडत्यांचे मोठे नुकसान होत आहे.

याकडे संचालक मंडळाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप बाजार घटक करत आहेत. पुणे बाजार समितीचा प्रमुख रस्ता असलेला शिवनेरी रस्ता अतिक्रमणमुक्त करण्याचा विशेष प्रयत्न तत्कालीन प्रशासक मधुकांत गरड यांनी केला होता. यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्‍न मिटला होता. मात्र संचालक मंडळ आल्यापासून वाहतुकीचा शिस्तीचा बोजवारा उडाला आहे.

बाजार समिती आवारात नियमित वाहतूक कोंडी होत असून, याचा त्रास बाजार घटकांसह बाजार समितीच्या परिसरातील रहिवाशांना देखील होत आहे. बाजार आवारात अनेक ठिकाणी शेतीमालाचे ट्रक रस्त्यात उभी करूनच विक्री करत आहेत. याला काही संचालकांचा आशीर्वाद असल्याची चर्चा बाजार आवारात आहे. अशा प्रकारांमुळे बाजार आवारातील वाहने बाहेर पडण्यास विलंब होत आहे.

वाहतूक कोंडीमध्ये प्रामुख्याने बाजार आवार, गांगाधाम चौक, शिवनेरी रस्ता, नेहरू रस्ता, बिबवेवाडीचा परिसर येतो. यामुळे होणाऱ्या प्रचंड वाहतूक कोंडीमुळे कर्कश हॉर्नच्या आवाजाचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी तब्बल ८० सुरक्षारक्षक नेमले आहेत.

मात्र सुरक्षारक्षक जागेवर नसल्याचे सध्याचे चित्र आहे. सततच्या वाहतूक कोंडीमुळे शेतमाल खरेदी-विक्रीचे गणित बिघडत चालले आहे. उशीर झाल्यास अडत्याना मागेल त्या भावात शेतमाल विकावा लागतो. वेळेमुळे शेतीमालाचे भाव पाडून या प्रक्रियेत केवळ शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT