Solar Pump Trouble Agrowon
ॲग्रो विशेष

Solar Pump Trouble: सोलरचा आग्रह पारंपरिक ऊर्जेस नकार

Solar Pump Fail: आता कृषिपंपांना पारंपरिक पद्धतीने वीजपुरवठा देणेच महावितरण कंपनीने बंद केले आहे. ‘मागेल त्याला सौरपंप’ या योजनेअंतर्गत अपारंपरिक पद्धतीने कृषिपंपांना वीजपुरवठा दिला जात आहे.

Team Agrowon

Chandrapur News: आता कृषिपंपांना पारंपरिक पद्धतीने वीजपुरवठा देणेच महावितरण कंपनीने बंद केले आहे. ‘मागेल त्याला सौरपंप’ या योजनेअंतर्गत अपारंपरिक पद्धतीने कृषिपंपांना वीजपुरवठा दिला जात आहे. विशेष म्हणजे या भागात सोलर कामच करीत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.

ज्या भागात पाण्याचे स्रोत आहेत. त्या भागातील शेतकऱ्यांनी विहिरी, कूपनलिका घेतल्या आहेत. त्यानंतर या पाण्याचा उपसा करण्यासाठी शेकडो शेतकऱ्यांनी कृषिपंपांना वीजजोडणी मिळावी यासाठी महावितरण कंपनीकडे अर्ज सादर केले. अर्ज आल्याच्या पार्श्वभूमीवर महावितरण कंपनीने डिमांडची रक्कम भरण्यास सांगितले.

त्यानुसार डिमांडची रक्कम भरणा करण्यात आली. डिमांड भरल्यानंतर आता कृषिपंपांना वीजजोडणी मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, गेल्या काही वर्षांपासून कृषिपंपांना वीजजोडणीची शेकडो प्रकरणे महावितरण कंपनीकडे प्रलंबित आहेत. त्याची वेगवेगळी कारणे महावितरण कंपनीकडून आता सांगण्यात येत आहे.

कृषिपंपांना वीजजोडणी देण्यासाठी आजवर कित्येकदा आंदोलने झाली. मात्र, प्रत्येकवेळेस आश्वासन देऊन वेळ मारून नेण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांत संतापाचे वातावरण आहे. आता तर राज्य शासनाच्या नव्या धोरणानुसार कृषिपंपांना पारंपरिक पद्धतीने वीजपुरवठा देण्याचे काम बंदच करण्यात आले आहे. आता केंद्र सरकारच्या पीएम कुसूम योजनेअंतर्गत मागेल त्याला सौरपंप ही योजना राबविली जात आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांना सोलर कृषिपंप दिले जात आहे.

‘डीपीडीसी’च्या बैठकीत मुद्दा गाजला

अलीकडेच जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीत कृषिपंपांना वीजजोडणीचा विचार चर्चेला आला. आमदार वडेट्टीवार यांनी कृषिपंपांना तातडीने वीजजोडणी करण्याची मागणी केली. आमदार देवराव भोंगळे यांनी ज्या शेतकऱ्यांना सोलर दिले. त्यांच्या तक्रारी असल्याचे सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Farming: भात पीक खरंच हवामान बदलाच्या संकटाला कारणीभूत ठरतंय का?

Onion Crisis: एकरी लाखाचा खर्च; हातात ६३ हजार

Maize Farming: मका पिकात आंतरपिके घेतल्यास मिळेल नफा

Krishi Kumbh 2026: ‘कृषी कुंभ- २०२६’मध्ये शेतकऱ्यांचा होणार सन्मान

Takari Irrigation Scheme: ‘ताकारी’च्या बंदिस्त वाहिनीचे काम अपूर्ण

SCROLL FOR NEXT