
Chh. Sambhajainagar News : एकीकडे शेतकऱ्यांना २४ तास वीज मिळण्यासाठी मागील त्याला सौर पंप योजना आणली गेली. दुसरीकडे सौर पंप मंजूर असलेल्या एका ग्राहकाला दीड वर्षापासून सौर पंप बसविण्याची प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे. याविषयी दिलेले अर्ज व स्मरण पत्रकारांना उत्तरच मिळत नसते याची माहिती सौर पंप घेऊन इच्छिणाऱ्या ग्राहकांनी दिली आहे.
या संदर्भात अधिक माहितीनुसार, शहरातील कीर्ती सहकारी गृह निर्माण संस्था एन ८ सिडको मध्ये राहणाऱ्या पुष्पाबाई बळवंत रगडे यांनी महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरण (महाऊर्जा)च्या सर्व व्यवस्थापकांना तब्बल चौथे स्मरणपत्र पाठविले आहे. त्यानुसार त्यांच्या विहिरीवर २२ मार्च २०२४ ला सौर पंप मंजूर झाला होता.
त्यांचा लाभार्थी क्रमांक १५०५२७११३३ असा आहे परंतु जवळपास दीड वर्षापासून त्यांच्या विहिरीवर सौर पंप कंपनीच्या हलगर्जीमुळे सौर पंप बसविला गेलेला नाही. या संदर्भात १६ एप्रिल २०२५ तसेच १६ नोव्हेंबर २०२४, १६ एप्रिल २०२४ व ९ मे २०२५ रोजी अर्ज सादर केले होते. २६ जून २०२५ ला दिलेल्या आपल्या पंतप्रधान तक्रारकर्त्या सौ.रगडे यांनी सरव्यवस्थापकांना काही प्रश्नही उपस्थित केले आहेत.
त्यानुसार आपला पंप न बसविता त्याचे देयक दिले आहे काय, सौर कंपन्या शेतकऱ्यांच्या विहिरीवर पंप पसरण्यास हलगर्जी करीत असतील तर त्यांच्याविरुद्ध आपण योग्य कारवाई करणार का, या महत्त्वाच्या प्रश्नांचा समावेश आहे.
यावेळी स्मरणपत्र देताना सौ. रगडे यांनी त्यांच्या शेतातील विहिरीवर त्वरित सौर पंप बसविण्याची पावले उचलावी अशी विनंती महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरण महाऊर्जाचे सर्व व्यवस्थापक यांना केली आहे. त्यामुळे आता तरी महाऊर्जा सौर पंपासाठी प्रतीक्षेत असलेल्या ग्राहकांना न्याय देणार का हा प्रश्न उपस्थित होत आहे.
वारंवार तक्रार करुनही मिळेणा पंप..
जालना जिल्ह्यातील सिरसगाव (मंडप) (ता. भोकरदन) येथील बाळू भास्कर सहाने या शेतकऱ्यालाही अनेक महिन्यांपासून सौर पंपाची प्रतीक्षा आहे. मार्च २०२४ मध्ये श्री. सहाणे यांनी सौर पपंसाठीची रक्कम भरली. यासंदर्भात वारंवार पाठपुरावा केला, मेडाच्या अधिकारी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सर्वांशी बोलून झाले.
मात्र फक्त मिळेल मिळेल असे उत्तर त्यांना मिळत, असल्याचे श्री सहाणे म्हणाले. त्यामुळे झटपट सौर पंप मिळेल रात्रीचे वेळीं सिंचनाची वेळ आपल्यावर येणार नाही, अशी त्यांची अपेक्षा अजून मात्र प्रत्यक्षात उतरली नसल्याची स्थिती आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.