
Chh. Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर परिमंडलात आतापर्यंत १० सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. त्यातून १५ हजार कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा केला जात, असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.
शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित व भरवशाचा वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० आहे. योजनेत छत्रपती संभाजीनगर परिमंडलात गेल्या महिनाभरात ६ सौर प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ४ व जालना जिल्ह्यातील २ प्रकल्पांचा यात समावेश आहे.
विकेंद्रित स्वरूपातील जगातील सर्वात मोठा सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी स्वतंत्र कृषी वीजनिर्मिती कंपनी स्थापन करण्यात आली आहे. जालना जिल्ह्यात २७ फेब्रुवारीला भोकरदन तालुक्यातील वालसा डावरगाव येथील ४ मेगावॅटचा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला. या प्रकल्पातून ८ गावातील ९५२ कृषिपंपांना दिवसा वीज दिली जात आहे. २८ फेब्रुवारीला खांडवी येथे ५ मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे.
या प्रकल्पातून खांडवी परिसरातील १३ गावांतील ११८० कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा केला जात आहे.छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड तालुक्यातील अन्वी उपकेंद्रांतर्गत रहिमाबाद येथील ५ मेगावॅटचा प्रकल्प १ मार्च कार्यान्वित झाला असून, रहिमाबाद व आसडीतील ९०० कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा होत आहे. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील खोडेगाव उपकेंद्रांर्तत जोडवाडीतील ४ मेगावॅटचा प्रकल्प २० मार्चला कार्यान्वित झाला आहे.
त्यातून गाडीवाट, गाडीवाट तांडा, घारदोन, घारदोन तांडा, खोडेगाव, लायगाव, रामेश्वरवाडी, काद्राबाद, बेंबळ्याची वाडी, जोडवाडी, कचनेर, कचनेर तांडा १ ते ८ आदी गावांतील १९५१ कृषिपंपांना दिवसा वीज दिली जात आहे. वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव उपकेंद्रांतर्गत भायगाव गंगा येथील ४ मेगावॅटचा प्रकल्प २८ मार्चला कार्यान्वित झाला आहे.त्यातून भायगाव गंगा, उंदीरवाडी, राजुरा, पाशापूर, राहेगाव, सोनवाडीच्या ५३७ कृषिपंपांना दिवसा वीज दिली जात आहे. सिल्लोड तालुक्यातील मंगरूळ उपकेंद्रांतर्गत वांगी येथे ४ मेगावॅटचा प्रकल्प ३० मार्चला कार्यान्वित झाला असून, त्यातून मंगरूळ, चांदापूर व पालोदच्या ८५० कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा केला जात आहे.
यापूर्वी या योजनेतील राज्यातील ३ मेगावॅट क्षमतेचा पहिला सौरऊर्जा प्रकल्प छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील धोंदलगाव (ता. वैजापूर) येथे ५ सप्टेंबर २०२४ रोजी कार्यान्वित झाला. हा प्रकल्प धोंदलगाव उपकेंद्राशी जोडण्यात आला. उपकेंद्रातून निघणाऱ्या ५ वीजवाहिन्यांवरील १७५३ शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा होत आहे. धोंदलगाव, नालेगाव, अमानतपूरवाडी व संजरपूरवाडी या गावांतील शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत आहे.
जिल्ह्यातील ६ मेगावॅट क्षमतेचा दुसरा प्रकल्प वरखेडी (ता. फुलंब्री) येथे उभारण्यात आला. २२ नोव्हेंबर २०२४ रोजी कार्यान्वित करण्यात आलेल्या या प्रकल्पातून आळंद व बोरगाव परिसरामधील ३२१५ शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत आहे. जालना जिल्ह्यातील ६ मेगावॅट क्षमतेचा पहिला प्रकल्प नेर उपकेंद्रांतर्गत हिवर्डी येथे २९ नोव्हेंबर २०२४ रोजी कार्यान्वित करण्यात आला. या प्रकल्पातून निर्माण झालेली वीज ३० गावांतील २५७० कृषिपंपांना पुरवली जात आहे. दुसरा प्रकल्प केळीगव्हाण (ता. बदनापूर) येथे ३१ डिसेंबर २०२४ रोजी कार्यान्वित करण्यात आला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.