Grape Season Agrowon
ॲग्रो विशेष

Grape Season : व्यापाऱ्यांकडून हंगामाच्या अखेरीस द्राक्षाची शोधाशोध

Grape Market Rate : कमी उपलब्धतेमुळे दरवाढ; प्रतिकिलो ३० रुपयांवर दर

Mukund Pingle

मुकुंद पिंगळे : ॲग्रोवन वृत्तसेवा
Nashik Agriculture News : गेल्या काही दिवसात द्राक्षांची उपलब्धता (Grape Avalibility) कमी झाल्याने व्यापाऱ्यांकडून माल शोधण्याची लगबग सुरू आहे. कमी उपलब्धतेमुळे दरात सुधारणा (Grape Rate) झाली आहे.

उशिराच्या बागांमधील द्राक्षांना ५० रुपये किलो दर अपेक्षित होता. मात्र आता ३० ते ३२ रुपये मिळत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

एप्रिल महिन्याच्या पहिल्या सप्ताहापर्यंत रंगीत व काळ्या वाणांचे खुडे आटोपले. नंतरच्या टप्प्यात फक्त सफेद वाण काढणीसाठी होते. मात्र ७ ते १६ एप्रिल दरम्यान झालेल्या वादळी वाऱ्यांसह पाऊस व गारपिटीने दाणादाण उडविली.

निर्यातदारांनी खुडे थांबविल्यानंतर स्थानिक बाजारपेठेसाठी मागणी मंदावली. प्रतिकिलोला २५ रुपये खर्च येत असताना चांगल्या मालाला १० ते १२ तर बेदाण्याला २ ते ५ रुपये भाव मिळत असल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडून पडला होता. मात्र आता दर वाढले आहेत.

अस्मानी संकटात नुकसान वाढल्याने खुडे बंद होऊन मनुके बनविण्याची नामुष्की ओढवली. अवघ्या दोन आठवड्यात कृषी विभागाने पंचनामे केल्यानुसार ३ हजार ४१० हेक्टर क्षेत्रावर बागांची धूळधाण झाल्याने २०० कोटींवर नुकसान वाढल्याची स्थिती आहे.

मालाच्या उपलब्धतेची स्थिती:
- जिल्ह्यात शेवटच्या १ ते २ टक्के मालाची काढणी शिल्लक
- प्रामुख्याने लांबट द्राक्ष वाणांची उपलब्धता तुरळक


- काही प्रमाणात निफाड, दिंडोरी, चांदवड, सिन्नर तालुक्यांत गोलाकार वाण उपलब्ध
- १० ते १५ रुपयांवरून थेट २५ ते ३५ रुपयांपर्यंत खरेदी


- पुढील आठवडाभर मालाची उपलब्ध राहण्याची शक्यता
- निफाड, सिन्नरसह नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात काही बागा शिल्लक


एप्रिल महिन्यात हंगाम गती घेत असतानाच नैसर्गिक आपत्तीच्या तडाख्यात द्राक्ष बागांची मोठी हानी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना माल काढण्यासाठी विनवण्या कराव्या लागल्या.

मात्र आता मालाचा तुटवडा असल्याने दर सुधारले आहेत. मात्र यंदाचा हंगाम द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी ग्रासलेला राहिला.
- ॲड. रवींद्र निमसे, विभागीय अध्यक्ष,
द्राक्ष बागायतदार संघ.

पावसामुळे उत्पादन घटले आहे. मात्र आता लेट बागेतील माल काढणीस असल्याने मागील महिन्याच्या तुलनेत दरात सुधारणा झाली आहे.

मात्र किलोला ५० रुपये दर अपेक्षित होता. दर वाढले असले तरीही खुडे करताना मनमानी आहेच.
- रावसाहेब मापारी, द्राक्ष उत्पादक, उगाव, ता. निफाड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT