Kolhapur Vegetables Market Agrowon
ॲग्रो विशेष

Tomato Prices Rise : कोल्हापूर मार्केटमध्ये टोमॅटोचा दरात तेजी, नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रताळांची आवक

Kolhapur Tomato Market : टोमॅटोला किरकोळ बाजारात चाळीस ते पन्नास रुपये असा किलोचा दर झाला आहे. मेथी, कोथिंबीर स्वस्त झाली असून दरही दहा ते बारा रुपये प्रति पेंडी असा भाव झाला आहे.

sandeep Shirguppe

Kolhapur Tomato Market Price: अचानक होत असलेल्या पावसाने भाजीपाला पिकावर परिणाम होत आहे. जोरदार पावसाने शेतात पाणी साचून भाजीपाला कूजत असल्याने बाजारात आवक कमी होत आहेत. दरम्यान ज्या उत्पादकांचा टोमॅटो टीकला आहे त्या शेतकऱ्यांच्या मालाला चांगला दर मिळत आहे.

टोमॅटोला किरकोळ बाजारात चाळीस ते पन्नास रुपये असा किलोचा दर झाला आहे. मेथी, कोथिंबीर स्वस्त झाली असून दरही दहा ते बारा रुपये प्रति पेंडी असा भाव झाला आहे. नवरात्रोत्सवानिमित्त बाजारपेठेत रताळांचीही आवक वाढली आहे. अन्य फळभाज्यांची ४० ते ५० रुपये किलो दराने विक्री होत आहे.

मागच्या महिन्यात कोंथिबीरचा दर ४० ते ५० रुपये पेंडी असा होता परंतु बाजारात आवक वाढल्याने दहा रुपये इतका दर झाला आहे. याशिवाय मेथी, शेपू, कांदापात या भाज्यांचे दरही १० ते १५ रुपये प्रति पेंडी असे आहेत. बाजारात वांगी, गवार, दोडका या फळभाज्यांची आवक वाढली आहे.

टोमॅटोचा दर दहा ते वीस रुपये प्रतिकिलो असा होता. तोच दर आता चाळीशीपार गेला आहे. या पिकांवर पावसाचा परिणाम झाल्याने आवक कमी आणि दर वाढले आहेत. लिंबू दहा रुपयास दोन नग, तर लसूण किलोला ३०० रुपये प्रतिकिलो असा भाव मिळत आहे.

फळभाज्यांचे प्रतिकिलोचे दर (रुपयांत)

कोबी २० ते ३०, वांगी ४० ते ५०, टोमॅटो ४०ते ५०, ओली मिरची ४० ते ५०, ढब्बू मिरची ३० ते ५०, घेवडा ४० ते ५०, ओला वाटाणा १०० ते १२०, भेंडी ४० ते ५०, कारली ४०, दोडका ३० ते ४०, काकडी ३० ते ४०, हिरवा टोमॅटो ४०, गाजर ४० ते ५०, फ्लॉवर ३० ते ५० रु, पडवळ १० ते २० रु. नग, मका कणीस ५ ते १५ रु, शेवगा शेंग १० रु, लसूण २८० ते ३२०, मुळा १० रु. नग.

पालेभाजी दर (प्रतिपेंडी रुपयांत)

कोथिंबीर १०, मेथी १०, कांदापात १०, पोकळा १०, शेपू १०, अंबाडी १०, पालक १० ते १५, पुदीना ५ ते १० रु.

फळांचे किलोचे दर (रुपयांत)

पेरू १०० ते १२०, सफरचंद १०० ते ३००, डाळिंब ८० ते १००, संत्री ५० ते ६०, सीताफळ ४० ते ६०, ड्रॅगन फळ १२०, किवी १२० ते १५०, टरबूज २०.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT