Tomato Rate agrowon
ॲग्रो विशेष

Tomato Rate : टोमॅटो, कांद्याचे भाव वाढ; पालेभाज्या दर चढेच, मिरची शेतकऱ्यांना ठरली फायद्याची

Kolhapur Market Rate : पालेभाज्यांमध्ये मेथी २५ रूपये, तर पोकळा १५ ते २० रूपये, पालक १५ ते २० रूपयांवर आणि कोथिंबीराचा पेंडीचा भाव अजूनही पन्नाशीत आहे.

sandeep Shirguppe

Vegetables Market Rate : कोल्हापूर जिल्ह्यासह अनेक भागात जोरदार पाऊस झाल्याने सर्वाधिक फटका टोमॅटो पिकावर झाला आहे. दरम्यान मागच्या आढवड्याच्या तुलनेत टोमॅटोचे दर साठीपार, तर मिरचीचा झटका १२० आणि कांद्याने ३० पार केली आहे. विशेष म्हणजे टोमॅटोने आठवड्यात दुप्पट भाव घेतला आहे. काही दिवसांपासून टोमॅटो भावाला आलेली मरगळ अचानक झटकून गेली आहे.

टोमॅटोला दर नसल्याने शेतकरीही नाराज होता. तसेच कांद्याचे भाव २० ते २५ रूपये किलो असे होते. त्याचेही दर दहा ते पंधरा रूपयांनी वाढले आहेत.

मात्र, टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी काही महिन्यांचा अनुभव बघता उत्पादनात हात आखडता घेतला आहे. त्यामुळे घाऊक बाजारात टोमॅटो ४० रूपये किलोवर गेला आहे, तर किरकोळ बाजारात हाच भाव ५० ते ६० रूपयांवर पोहचला आहे. पालेभाज्यांमध्ये मेथी २५ रूपये, तर पोकळा १५ ते २० रूपये, पालक १५ ते २० रूपयांवर आणि कोथिंबीराचा पेंडीचा भाव अजूनही पन्नाशीत आहे.

पालेभाज्याचे दर रूपयांत

मेथी पेंडी २५ ते ३०, पोकळा १५ ते २०, शेपू २०, अंबाडी १०, पालक १५ ते १०, तांदळी १०, शेवगा ५ ते १०, लाल माट १० ते १५, अळू ५ ते १०, कांदापात २०, कोथिंबीर ५० ते ६०.

फळभाज्यांचे किलोचे दर रूपयांत

गवार १०० ते १२०, भेंडी ६०, वरणा १२०, बिनीस १२० ते १४०, हिरवी मिरची १२० ते १४०, शेवगा १० ते २०, ढबू ८०, हिरवा वाटाणा ८०, दोडका ६०, घेवडा ६०, काकडी ६०, फ्लॉवर २० ते ४०, कोबी २० ते ३०, भोपळा फोड २०, दुधी भोपळा १५ ते२५, लिंबू १० चार नग, कांदा ३० ते ४०, बटाटा ३० ते ४० रूपये किलो.

फळांचे किलोचे दर रूपयांत

तोतापुरी १० ते २५, सफरचंद १८० ते ३००, डाळींब १०० ते २००, द्राक्षे ८० ते १००, संत्री १०० ते १४०, चिकू ५० ते ६०, ड्रॅगन फ्रुट १०० ते १२० किलो, केळी (जवारी ) ४० ते ६० रूपये डझन, केळी (वसई) २० ते ५० रू. डझन

खाद्यतेलाचे किलोचे दर रूपयात

शेंगतेल २०४, सरकी ११६, सूर्यफूल १२०, सोयाबीन ११० खोबरे तेल २४० रूपये किलो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabbage Farming: कोबी पिकात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब

Brazil Agricultural Cooperation: ब्राझीलसोबत कृषी क्षेत्रामध्ये सहकार्य संधी

Onion MSP Demand: कांद्याला तातडीने प्रतिक्विंटल २ हजार हमीभाव, १,५०० रुपये अनुदान देण्याची मागणी

Akola Heatwave: अकोला जिल्ह्यात अति उष्णतेमुळे होरपळ

Mini kit Seeds Application: मिनीकिट बियाण्यांसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT