Tomato Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Tomato Cultivation : पुणे जिल्ह्यातील आंबेगावच्या पूर्व भागात टोमॅटो लागवडीला वेग

Tomato Crop : उन्हाच्या झळा काहीशा कमी झाल्याने आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात टोमॅटो लागवडीला वेग आला आहे.

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Tomato news : पुणे : उन्हाच्या झळा काहीशा कमी झाल्याने आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात टोमॅटो लागवडीला वेग आला आहे.

पूर्व भागातील लाखणगाव, काठापूर, पारगाव, जारकरवाडी, पोंदेवाडी, खडकवाडी, लोणी धामणी आदी गावांमध्ये टोमॅटो उत्पादक शेतकरी टोमॅटो लागवडीत व्यग्र असल्याचे पाहायला मिळत आहे.

तालुक्यात सुमारे १३ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावर शेतकरी भाजीपाला पिकांची लागवड करतात. यात प्रामुख्याने सर्वाधिक लागवड ही टोमॅटो पिकांची असते. टोमॅटो पिकाची लागवड तीनही हंगामांत करता येते.

खरीप हंगामासाठी जून ते जुलै, रब्बी हंगामासाठी सप्टेंबर ते ऑक्टोबर आणि उन्हाळी हंगामासाठी डिसेंबर ते जानेवारी महिन्यांत लागवड होते.

साधारणपणे २५ ते ३० दिवसांनंतर रोपे लागवडीस येतात. त्यानंतर रोपांची शेतात लागवड केली जाते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुणे, मुंबईतील बाजारपेठ जवळ असल्याने अनेक शेतकरी वर्षभर टोमॅटोचे पीक घेतात.

संरक्षित शेतीमध्ये शेडनेटमध्ये पिके घेत असताना प्लॅस्टिकच्या मल्चिंगचा वापर केला जातो. त्यामुळे पिकांच्या पांढऱ्या मुळ्याची वाढ चांगली होऊन उत्पादनात चांगली वाढ होते, असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. याशिवाय तणांचा प्रादुर्भाव कमी होऊन पाण्याची बचत झाली होते.


तालुक्यात शेतकरी मार्च ते एप्रिल टोमॅटो लागवडीवर अधिक भर दिला जातो. त्यामुळे टोमॅटोला चांगला दर मिळतो असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. सध्या बाजारात टोमॅटोचे दर अपेक्षित नसल्यामुळे काही प्रमाणात टोमॅटो उत्पादकांना तोटा सहन करावा लागत आहे.

मात्र लागवड केलेल्या टोमॅटोला जून ते जुलै महिन्यात चांगले दर मिळतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. गेल्या काही वर्षांपासून खेड, आंबेगाव, जुन्नर भागांतील अनेक शेतकरी प्लॅस्टिक मल्चिंगचा वापर करून टोमॅटो पीक घेत असल्यामुळे उत्पादनात चांगली वाढ होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

माझ्याकडे एकूण १५ शेती आहे. त्यापैकी पाच एकर क्षेत्रांत गेल्या पंधरा वर्षांपासून टोमॅटो लागवड करीत आहे. पाच एकर क्षेत्रात साधारणपणे ३० हजार रोपे तयार करून लागवड करतो.

उत्पादन सुरू होईपर्यंत सुमारे ६० ते ७० हजार रुपयांचा खर्च येतो. यंदाही नुकतीच लागवड केली आहे.
- श्याम बढेकर, टोमॅटो उत्पादक शेतकरी, जारकरवाडी, ता. आंबेगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी?

Pandharpur Wari: पंढरपूरच्या वाटेवर संतांचे पालखी सोहळे

Maharashtra Transport Strike: मालवाहतूकदारांच्या आंदोलनाला प्रतिसाद

Tur Dal Cess Scam: तूर सेस चोरीच्या दंडाचे २६ लाख न्यायालयात आगाऊ भरावेत

Global Onion Market: भारतीय कांद्यापेक्षा पाकिस्तान, चीनच्या कांद्याला मागणी

SCROLL FOR NEXT